गेल्या महिनाभरात आयुष्यात अटेंड केली नसतील एवढी लग्न अटेंड केली. कधीतर सकाळी आणि संध्याकाळी, कधी संध्याकाळी दोन किंवा तीन लग्न. हा ट्रॅफिक जॅम सगळीकडे, त्यात दोन टोकाला दोन लग्न असली की लागली वाट. म्हणजे असं व्हायचं की लग्नाला पोहोचायला तास-दीड तास जायचा, तिथे रांगेत उभं राहण्यात किमान अर्धा ते एक तास आणि अॅक्च्युअली भेटणं एक ते दोन मिनिटांचं. जमाना बदल रहा है। डू वुई नीड टू चेंज समथिंग?
‘क्या बात करते हो, आप डेस्टिनेशन वेडिंग भी कराते हो?’ वीणा वर्ल्ड म्हणजे ‘जगाला जग दाखवायचं’ पर्यटनातून ही ओळख आजपर्यंतची. डेस्टिनेशन वेडिंग हा बघणार्याच्या दृष्टीने थोडा वेगळा प्रकार. त्याचा वीणा वर्ल्डशी काय संबंध? पण आमच्या दृष्टीने तो वीणा वर्ल्डच्या अखत्यारीतला भाग कारण त्याचा संबंध आहे आनंदाशी. पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना देशविदेशांची भ्रमंती घडवायची, त्यांना त्यांच्या रूटीनमधून बाहेर काढून जरा ‘एक ब्रेक तो बनताही है।’ म्हणत पर्यटनानंद मिळवून द्यायचा हे आमचं काम. आम्ही आहोत आनंदाच्या व्यवसायात. वीणा वर्ल्डच्या स्टाईलने सहली करणं, त्या पर्यटकांना आवडणं, त्याद्वारे वीणा वर्ल्डची लोकप्रियता वाढणं हे आमचं व्यवसायचक्र. जरी पर्यटनात आम्ही पस्तीस वर्ष योगदान दिलं असलं तरी वीणा वर्ल्ड झाल्याला साडेपाच वर्षच झालेली, त्यात साडेतीन लाख पर्यटकांना सहली घडवणं हे अभूतपूर्व काम वीणा वर्ल्ड टीमने केलं आणि त्याचा फायदा असा झाला की वीणा वर्ल्डची एकंदरीत कार्यपद्धती बघून कॉर्पोरेट वर्ल्ड आकर्षित झालं वीणा वर्ल्डकडे. कॉर्पोरेट टूर्स म्हणजे तसा नाजूक भाग. सगळं काही एकदम योजनाबद्ध रीतीने व्हायला पाहिजे, तिथेच नाळ जमली वीणा वर्ल्ड आणि कॉर्पोरेट वर्ल्डची. प्रोफेशनल मॅनेजमेंटसोबत पर्सनल अटेंशन आणि स्मॉलेस्ट डीटेल्सपर्यंत पोहोचणं, काहीही गृहीत न धरणं ही वीणा वर्ल्ड संस्कृती संपूर्ण टीममध्ये रुजली असल्याने नेहमीच्या फॅमिली टूर्ससोबतच वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशल, हनिमून स्पेशल, ग्रँड पॅरेंट-ग्रँड चिल्ड्रेन स्पेशल, टूर्स फॉर स्पेशली एबल्ड, ज्यूबिली स्पेशल, परदेशातील भारतीयांसाठी इंडिया इनबाऊंड टूर्स आणि फ्री इन्डिव्हिज्युअल हॉलिडे हे वेगवेगळे प्रकार शंभर टक्क्यांहून अधिक यशस्वी तसंच लोकप्रिय झाले. कॉर्पोरेट जगताच्या टूर्स त्यामुळे चालून आल्या. डीलर्स इन्सेन्टिव्ह टूर्स, अॅन्युअल अवॉर्ड फंक्शन्स, सेल्स स्ट्रॅटेजी मीट्स, टीम बिल्डिंग सेमिनार्स, एक्झिबिशन टूर्स अशा सर्व प्रकारच्या टूर्स आणि त्यावर होणारे मोठमोठे इव्हेंट्स वीणा वर्ल्ड टीम लिलया सांभाळू लागली, ‘वीणा वर्ल्ड माईस’ हे महत्त्वाचं बिझनेस युनिट बनलं आणि कॉर्पोरेट वर्ल्ड सर्व्हिससाठी वीणा वर्ल्डकडे यायला लागलं. आम्हालाही तेच हवं होतं, पर्यटकांनी किंवा कॉर्पोरेट्सनी आमच्याकडे कमी प्राईससाठी न येता सर्व्हिससाठी यावं ही आमची तळमळपूर्ण आंतरिक इच्छा. म्हणजे आजच्या जमान्यात प्राईस कॉम्पीटिटीव्ह द्यावी लागतेच, त्यातून कुणाची सुटका नाही पण ते करताना ‘कटिंग द कॉर्नर्स’ होऊ न देणं हे महत्त्वाचं. फॅमिली टूर, स्पेशालिटी टूर वा कॉर्पोरेट टूर, एन्ड रीझल्ट हा आनंदाचाच असला पहिजे हेच लक्ष्य.
‘मॉम मी लग्न करतोय’ एक दिवस नीलने येऊन सांगितलं. वॉव! ह्या दिवसाची आम्ही आतूरतेने वाट बघत होतो. ‘काय म्हणतोस? कधी? कुठे? कोण मुलगी आहे? कसं जमलं? चला आता तरी छान छान कपड्याचं शॉपिंग करायला मिळेल’. प्रश्नांची सरबत्ती केल्यावर, ‘वेट..वेट..वेट.. एवढी एक्साईट होऊ नकोस लग्न मी करीत नाहीये. सिंगापूरमधली मुलगी आहे आणि ऑस्ट्रेलियामधला मुलगा आहे. आपले इंडियन्सच आहेत, ऑस्ट्रेलियात सेटल झालेयत पण त्यांना लग्न भारतात करायचंय, त्यांनी मला विचारलं की, तुम्ही हे डेस्टिनेशन वेडिंग कराल का म्हणून आणि मी हो म्हटलं, ते भारतात येताहेत आणि त्यांच्यासोबत इथे मीटिंग करून आम्ही आपल्या टीमलाही सोबत घेऊन राजस्थानला जातोय’. ओ हो! म्हणजे हे लग्न वीणा वर्ल्डचं बिझनेस व्हेंचर होतं तर. माझी ‘शादी की शॉपिंग’ ही इच्छा मी तूर्त बाजूला ठेवून नील आणि टीमला ‘ऑल द बेस्ट’ म्हटलं. व्हेंचर नवीन होतं, मनात धाकधूक होतीच. एक तर नीलने स्वत: हा एक वेगळा प्रकार वीणा वर्ल्डमध्ये आणला होता आणि दुसरं म्हणजे बिझनेस थोडावेळ बाजूला ठेवला तर मी आई होते त्याची, त्यामुळे त्याने ह्या नवीन घेतलेल्या व्हेंचरमध्ये शंभर टक्के यशस्वी व्हावं ही काळजीयुक्त इच्छा होती, त्यासाठी मनातल्या मनात देवाची प्रार्थनाही सुरू होती. लग्न जयपूरला होतं, योगायोगाने मी ही त्या दिवशी वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल सहलीतल्या पर्यटकांना भेटायला तिथे गेले होते. पण लग्नाच्या ठिकाणी जाणं मी टाळलं. माझं मन आतूरलं होतं ते लग्न कसं झालं हे ऐकण्यासाठी. ब्राईड-ग्रुमला, त्यांच्या घरच्या मंडळींना, अनेक देशांतून आलेल्या त्यांच्या मित्रमंडळींना ते आवडलं का? नील आणि आमच्या टीमवर विश्चास होता पण कोणत्याही नवीन कामात ते सगळं यशस्वी होईपर्यंत आपल्या पोटात खड्डा पडतोच तशी बेचैनी होती. रात्री एक वाजता मोबाईलवर व्हीडियो आला ज्यात नवरा-नवरी आणि त्यांच्या आईवडीलांनी नील आणि टीमचे, त्यांच्या व्यवस्थापनाचे, वीणा वर्ल्ड टीमच्या प्रोफेशनली पर्सनलाईज्ड सर्व्हिसचे खास आभार मानले होते, आणि मी धन्य झाले. परीक्षेत पहिला नंबर आल्यासारखा माझा आनंद गगनात मावेना. कारण ह्या डेस्टिनेशन वेडिंगच्या शंभर टक्क्यांहून अधिक यशस्वीतेवर तर आमचं ठरणार होतं हे बिझनेस व्हेंचर, पुढे न्यायचं की नाही ते. त्याला ग्रीन सिग्नल मिळाला होता.
आणि आम्ही सुरू केली वीणा वर्ल्डची डेस्टिनेशन वेडिंग डिव्हिजन. जसा वीणा वर्ल्डचा जन्म पर्यटकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त जग उत्कृष्टतर्हेने दाखविण्यासाठी झाला तसंच डेस्टिनेशन वेडिंग ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी न राहता डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद इच्छुकांना मिळाला पाहिजे, हा वीडा आम्ही उचललाय. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फायदा असतो तो इंटिमसीचा. लग्न हे उत्कट आनंदाचं एक प्रायव्हेट अफेअर. पण नवरा-नवरीपासून सर्वच जण दमून इतके एक्झॉस्ट होऊन जातात की काही विचारू नका. एका वधूवरांनी तर माझ्या कानात सांगितलं, ‘टोटली एक्झॉस्टेड, आता बस वाटतंय’. मी ही विचार करू लागले की नक्की कसं असावं लग्न?
मागे एकदा एका बॉलीवूडच्या प्रोड्युसरशी भेट झाली होती, त्यांना म्हटलं, ‘‘आजकाल तुम्ही भारतातल्या लोकेशन्सपेक्षा परदेशात जास्त शुटिंग करता त्याचं कारण काय?’’ तर म्हणे, ‘तिथे इथल्यासारखे ऑबस्टॅकल्स नसतात. इथे भारतात क्रु म्हणा किंवा अॅक्टर्स अनेक गोष्टीत अडकलेले. ठरलेल्या वेळी शुटिंग सुरू होणं आणि संपणं म्हणजे डोक्याला ताप. परदेशात गेल्यावर सर्वजण त्या एकाच प्रोजेक्टवर असतात. नो ऑब्स्टॅकल्स, कॉन्सनट्रेशन चांगलं होतं, अॅक्टिंगही जास्त चांगली होते हा माझा अनुभव आणि हल्ली तर टूरिझम बोर्डस्ही मदत करतात’. ही गोष्ट मला इथे आठवायचं कारण म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगही जुळणार्या दोन कुटुंबांचं आणि त्यांच्या निअर अॅन्ड डीयरचं एक इंटिमेट अफेअर. तेवढ्या लोकांनी त्याचा मनमुराद आनंद घेणं हे जास्त महत्त्वाचं. आता पॉलिटिकल लीडर्स किंवा मोठे उद्योगपती ह्यांना शाही विवाहसोहळ्यांची गरज असते कारण कधी ती टीम बिल्डिंग असते तर कुठे पावर प्ले. पण आपल्यासारख्या मंडळींना थोडा वेगळा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे आता डेस्टिनेशन वेडिंग करणं आम्ही सुरू केलं म्हणून मी म्हणत नाहीये तर अनेक लग्नांच्या निरीक्षणातून माझं विचार करणं सुरू झालं.
पूर्वी कशी मस्त लग्न चालायची चारचार पाचपाच दिवस, कधी कधी आठवडाभर. सगळी नातेवाईक मंडळी जमायची. गप्पांचे फड बसायचे, पत्त्याचे जोड कमी पडायचे, गॉसिप्सना उत यायचा, सुख-दु:खाच्या देवाणघेवाणीने आधार वाटायचा. हास्यकल्लोळाने घर भरून जायचं. लग्नघर खर्या अर्थाने लग्नघर वाटायचं, उत्सव बनायचा त्याचा. तसेच्या तसे दिवस पुन्हा येणं, प्रत्येक घरात तो माहोल निर्माण होणं आत्ताच्या जीवनशैलीत थोडं कठीण. एकत्र कुटुंबपद्धती कमी व्हायला लागली, घरं छोटी झाली, कामांची प्रेशर्स वाढली, प्रत्येक ठिकाणी असलेल्या स्पर्धेला तोंड देता देता दमछाक व्हायला लागली त्यात ‘लग्न उरकलं ग बाई एकदाचं!’ अशी अवस्था झाली. आणि म्हणूनच ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संकल्पना तो पूर्वीचा लग्नसोहळ्याचा माहोल पुन्हा उभा करायला मला एक सुवर्णसंधी वाटायला लागली. दोन किंवा तीन दिवस एखाद्या ठिकाणी जायचं, वधूवर आणि आप्तांनी फक्त मिरवायचं, नो टेंशन अॅट ऑल! टेंशन घ्यायचं काम आमचं. कारण देशातली किंवा विदेशातली डेस्टिनेशन्स आणि तिथले असोसिएट्स तसंच वीणा वर्ल्ड डेस्टिनेशन वेडिंग टीम ही आहे आमची स्ट्रेन्थ.
आत्ता आम्ही हातात घेतलंय ते पन्नास जणांच्या कुटुंबाच्या डेस्टिनेशन वेडिंगपासून पाचशे जणांचं डेस्टिनेशन वेडिंग. म्हणजे दोन हजार लोकांचं डेस्टिनेशन वेडिंग आलं तर आम्ही करणार नाही असं नाही, आत्ताही आम्ही देश-विदेशात मोठ्या कॉर्पोरेट ग्रुप्सचे इव्हेंट्स करतोच की. पण जसं वर म्हटलं तसं हे इंटिमेट अफेअर इंटिमेट पद्धतीने व्हायला पाचशेपर्यंतची संख्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी जास्त चांगली वाटते,आटोपशीर वाटते. नवरा-नवरीने लग्नाच्या धावपळीत दमायचं नाही आणि तिच्या व त्याच्या घरच्यांनीही. ती सगळी जबाबदारी वीणा वर्ल्डची. लग्न म्हणजे एक पूर्णपणे चिंताविरहीत आनंदाचा सोहळा आणि दे धम्माल फॅमिली गेट टुगेदर झालं पाहिजे जवळच्या तसंच दूरच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचं
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अथपासून इतिपर्यंत जबाबदारी आमची असते आणि त्यात येतं प्रामुख्याने प्री-वेडिंग शूट, अॅक्च्युअल डेस्टिनेशन वेडिंग,हनिमून टूर आणि फॅमिलीसाठी हॉलिडे एक्सटेंशन. जसं पन्नास जणांपासून पाचशे जणांपर्यंतच्या वधूवर वर्हडी मंडळींविषयी बोलले तसं अगदी दहा पंधरा लाखांपासून डेस्टिनेशन वेडिंग करता आलं पाहिजे, मग वरचं बजेट दहा कोटींचं का असेना, वुई विल मेक इट पॉसिबल. सो! लेट्स थिंक समथिंग डिफरंट अॅन्ड मेक इट हॅप्पन!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.