एन्जॉय युअरसेल्फ व्हाईल
यू आर स्टिल इन द पिंक,
एन्जॉय युवरसेल्फ,
इट्स लेटर दॅन यू थिंक
यू वर्क अॅन्ड वर्क फॉर इयर्स अॅन्ड इयर्स,
यू आर ऑलवेज ऑन द गो,
नेव्हर टेक अ मिनिट ऑफ,
टू बिझी मेकिंग डो, सम डे, यू से,
यू विल हॅव युवर फन...
द इयर्स गो बाय
अॅज क्विकली अॅज अ विंक... एन्जॉय युवरसेल्फ व्हाईल यू आर स्टिल इन द पिंक...आत्ताच इंटरनेटवर जाऊन पूर्ण ऐका हे गाणं, साम्य दिसतंय आपल्याशी काही?
डोरिस डे चं एन्जॉय युवरसेल्फ व्हाईल यू आर स्टिल इन द पिकं हे गाणं ऐकल्यावर वाटतं, काळ बदलला, जीवनमान सुधारलं, जग पुढे गेलं पण सदुसष्ट-अडुसष्ट वर्षांपूर्वी लिहिलेले या गाण्याचे शब्द आजच्या डिजिटल युगातील महिलांनाही तितकेच लागू होतात. हे गाणं म्हणजे तर मला आमच्या वुमन्स स्पेशलचं अॅन्थम वाटतं. सुमारे तेरा वर्षांपूर्वी मी महिलांची, महिलांसाठी आणि महिलांनी केलेली सहल म्हणून वुमन्स स्पेशलचा कन्सेप्ट ज्या विचाराने प्रत्यक्षात आणला तोच विचार ह्या सत्तर वर्षांपूर्वीच्या गाण्यात मांडलेला आहे.
जग पुढे गेलं पण अजूनही घरातल्या महिलेची परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. उलट आता तर घर आणि नोकरी वा व्यवसाय अशा दोन आघाड्या सांभाळता सांभाळता तिला स्वतःसाठी वेळच उरत नाहिये. म्हणूनच तिला सांगायची खरी गरज आहे की एन्जॉय युवरसेल्फ व्हाईल यू आर स्टिल इन द पिंक. सर्वसाधारणपणे महिलांचा स्वभाव असा असतो की त्या आधी कुटुंबातल्या इतरांच्या सुखाचा, समाधानाचा विचार करतात. साधं घरात काही गोडधोड केलं तरी आधी त्या मुलांसाठी, नवर्यासाठी, सासू सासर्यांसाठी ठेवून मग (उरलं तर!) स्वतःला वाढतात. एकूण काय स्वतःच्या बाबतीत नेहमीच पाहू नंतर, करू नंतर असं म्हणायचं आणि मग मैत्रिणींशी बोलताना, बहिणीला फोन केल्यावर म्हणायचं की कंटाळले गं रोजच्या रामरगाड्याला. एकदा सुट्टी घेऊन चार दिवस कुठे तरी जाईन म्हणते, पण हे चार दिवस काही उगवत नाहीत. अशा सगळ्या महिलांसाठीच एन्जॉय युवरसेल्फ व्हाईल यू आर स्टिल इन द पिंक हे गाणं बनलं असावं. स्वतःच्या घरासाठी, कुटुंबासाठी, परिवारातल्या सदस्यांसाठी किंवा स्वतःच्या करिअरसाठी, व्यवसायासाठी अहोरात्र कष्ट करणार्या, एकदाही सुट्टी न घेता २४x७ आपली ड्युटी आपुलकीनं, जबाबदारीनं आणि मायेनं बजावणार्या अनेकजणी हेच विसरतात की त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि तो आत्ताच द्यायला हवा. खरंतर आत्ताही तसा उशीरच झालाय, पण म्हणतात ना देर आये, दुरूस्त आये तसं निदान आत्ता तरी स्वतःसाठी वेळ काढूया, आपल्याला ज्यात आनंद वाटतो अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद मनापासून घेऊया.
या गाण्यात पुढे म्हटलंय की आपण सतत कसली तरी काळजी करत राहतो, कधी ती मुलांची असते कधी कामाची असते तर कधी-कधी सगळंच कसं सुरळीत चाललंय याची काळजी. पण ह्या काळजीच्या घेर्यात आपल्या चेहर्यावरचं हसू कधी पुसलं जातं कळतंच नाही. आठवा बघू स्वतःशी खळाळून कधी हसला होतात? जे हसणं तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांसाठीच फ्रेशनरचं काम करतं ते हसूच जर आपल्या चेहर्यावर उमटत नसेल तर कठीण आहे. अशानं आपण जगाच्या उपहासाचा विषय ठरू, त्यापेक्षा एन्जॉय युवरसेल्फ, इट्स लेटर दॅन यू थिंक. काळजी, चिंता, विवंचना तर आहेतच पण त्यांच्याशी सामना करायचा तर मन प्रसन्न हवं, मनात आनंदाची लहर फिरायला हवी आणि मनात समाधानाचे तरंग उमटायला हवेत. जर घरातल्या महिलेचं मन प्रसन्न नसेल, जर तिच्या चेहर्यावर हसू उमटत नसेल तर ते घर तरी प्रसन्न, समाधानी असेल का? मुलगी शिकली प्रगती झाली हे जितकं खरं आहे तितकच ती हसली आणि घर हसलं हे सुध्दा खरं आहे. तिने आपल्या आनंदाचा बहाणा उगाचच पुढे ढकलू नये.
हे आनंदाचे बहाणे, हसण्याचं निमित्त मिळवून देणारी सहल म्हणजेच आपली वुमन्स स्पेशल. थायलंडपासून युरोपपर्यंत आणि अंदमानपासून लेह लडाखपर्यंत वुमन्स स्पेशलची आनंदयात्रा सुरू असते. जेव्हा ही अभिनव संकल्पना मी प्रत्यक्षात आणली तेव्हा अनेक भुवया उंचावल्या होत्या आणि काही चेहर्यांवर प्रश्नचिन्हे उमटली होती. पण माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि पर्यटन उद्योगातील अनुभवावरून एक कळलं होतं की डोरिस डेच्या गाण्याप्रमाणे कमॉन, नाऊ यू गॉट टू हॅव फन हे सगळ्या महिलांना सांगायची गरज आहे. आता अचानक असं कोणी तरी सांगायला लागलं की चला मज्जा करा, धम्माल करा, तर आपण एकट्यानेच कशी धम्माल करायची? हा प्रश्न अनेकींच्या मनात येणं स्वाभाविक आहे. सुरुवाती सुरुवातीला वुमन्स स्पेशलवर येणार्या अनेकजणींच्या डोळ्यात, मनात, बोलण्यात ही गिल्ट मला जाणवायची. टूरवर पहिल्याच दिवशी घरातल्यांच्या, मुलांच्या आठवणीनं कावर्या बावर्या झालेल्या, फोनवरून पतीराजांना डबा कसा भरा आणि सासूबाईंना गोळ्या घ्यायची आठवण करणार्या सगळ्याजणी पुढच्या चार पाच दिवसात इतक्या मोकळ्या होतात आणि टूरवर मिळालेल्या नव्या मैत्रिणींच्या गराड्यात खुलतात की त्यांना आणायला एअरपोर्टवर आलेल्या त्यांच्या पतींच्या चेहर्यावर आपली टूरवर गेलेली पत्नी हीच होती का? असा प्रश्न उमटलेला मी पाहिला आहे. ही सगळी किमया असते वुमन्स स्पेशलच्या जादुई वातावरणाची. बघा ना, नेहमी कोणती तरी जबाबदारी घेणारी, कोणाची तरी काळजी करणारी, कोणासाठी तरी मागे राहाणारी महिला जेव्हा एकट्यानेच जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडते, तिच्यावर कसलीही जबाबदारी नसते, सकाळी नाश्ता काय बनवायचा किंवा ऑफिसच्या प्रोजेक्टची डेडलाईन तर मिस होणार नाही? यातली कोणतीही काळजी मनात न ठेवता जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून जैसलमेरच्या वाळवंटात किंवा केरळच्या बॅकवॉटरमध्ये नाहीतर मॉरिशसच्या सागर किनार्यावर किंवा पॅरिसच्या सीन क्रुझवर महिलांचा मेळा जमतो तेव्हा खर्या अर्थानं त्या सगळ्याजणी आपलं लाईफ एन्जॉय करत असतात.
वुमन्स स्पेशल सहलीचे हे सात-आठ दिवस म्हणजे ह्या सगळ्या मुलींसाठी (हो ! वुमन्स स्पेशलवर सगळ्या मुलीच असतात बरं !!) एक अनोखा ब्रेक ठरतो. वेगवेगळ्या शहरातल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या महिला एकमेकींना भेटतात. त्यांच्यात होणारी संवादाची आणि संस्कृतीची देवाण घेवाण मजेदार असते.
आय अॅम ब्युटीफुल, आय अॅम बोल्ड, आय अॅम द क्वीन अँड आय लव्ह मायसेल्फ हा आमच्या वुमन्स स्पेशलचा कन्सेप्ट आहे. मी माझं आयुष्य आनंदात जगतेय, तू तुझं आयुष्य आनंदात जग आणि त्यासाठी दोघींनी एकमेकींना मदत करूया आणि जीवनाच्या आनंदी सफरीवर सहभागी होऊया हा सिधासाधा मामला आहे जो वुमन्स स्पेशलवर जगला जातोय पण पुढे तो आयुष्यातही कामी येतो. आयुष्य छोटं आहे, ते सगळ्यांनाच तेवढंच सोप्पं आहे किंवा तेवढंच अवघड, ते झेलायचंच आहे. त्यातले खाचखळगे कुणालाही चुकले नाहीत पण ते हसत हसत लिलया पेलण्यासाठीची सकारात्मक मनोवृत्ती जागृत करण्याचं बळ हे वुमन्स स्पेशलला एकमेकींकडून एकमेकींना मिळत राहतं. निर्धास्त-बिनधास्त- बोल्ड हा नारा आम्ही लावत असलो तरी इतक्या वर्षांत कधीही ह्या वुमन्स स्पेशलची लेव्हल खाली गेली नाही. डीसेन्सी, डिग्निटी आणि सुरक्षितता ह्या गोष्टी खूप चांगल्या तर्हेने जोपासल्या गेल्या आणि वुमन्स स्पेशलवरचा विश्वास वाढतच राहिला. घरातल्यांनाही लेह लडाख असो वा लंडन, ऑस्ट्रेलिया वा अमेरिका आईला, आजीला, सासूबाईंना, बहिणीला, मुलीला, सुनेला एकटं पाठवायला भीती वाटली नाही. एवढ्या महिला एकत्र जाताहेत सहलीवर, भांडणं होत नाहीत? हा प्रश्न मला विचारला जातो. अहो, वेळ कुणाला आहे भांडाभांड करायला. आम्ही आमच्यातच मश्गूल आहे. वेळ कुठे मिळाला होता इतकी अनेक वर्ष स्वत:कडे बघायला? स्वत:चे लाड करायला? नटायला? सजायला? मिरवायला? हीयर ऑन द टूर वुई आर डॅम बीझी! नो टाईम फॉर एनी पेट्टी इश्युज!
तर असा आहे आमचा म्हणजेच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलचा फंडा. आनंदाचा, उत्साहाचा, प्रेरणेचा, आत्मविश्वासाचा, सहकार्याचा आणि सकारात्मकतेचा. यू आर मोस्ट वेलकम इन धिस वर्ल्ड ऑफ वुमन्स स्पेशल! भारतामधल्या शिमला मनालीपासून ते लेह लडाख अंदमानपर्यंत आणि आपल्या शेजारच्या नेपाळ भूतानपासून ते दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियापर्यंत जगाच्या पाठीवर वुमन्स स्पेशलची दिंडी निघालेली आहे. आता आणखी उशिर करू नका, आधीच खूप वेळ गेला आहे, तेव्हा एन्जॉय युअरसेल्फ व्हाईल यू आर स्टिल इन द पिंक.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.