काठीला सोनं बांधून काशीकडे कूच करून मोक्षप्राप्ती करण्याचे दिवस संपले. मनःशांतीसाठी मात्र आजही आपली सर्वांची भटकंती सुरू आहेच आणि भटकंतीचा थोडा जरी सुगावा लागला तरी आम्ही त्यातला अविभाज्य भाग आहोत किंवा बनलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज काशीला म्हणजे वाराणसीलाही आम्ही पर्यटकांना नेतो मोक्षप्राप्तीसाठी नव्हे तर पर्यटनानंदासाठी. एक सुविचार आठवला, वन्स डेस्टिनेशन इज नेव्हर अ प्लेस, बट अ न्यू वे ऑफ सीइंग थिंग्ज!
आठ मार्चला वुमन्स डे च्या दिवशी थायलंडला होते. ह्या दिवशी आम्ही वन डे पिकनिकपासून अमृतसर, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बाली, चायना युरोपच्या वुमन्स स्पेशल आयोजित करतो. ह्यातल्या एक दोन सहलींना मी हजेरी लावते. काय चाललंय, कसं चाललंय, काय पाहिजे, काय नको, आणखी काही करायला पाहिजे का अशा बर्याच गोष्टींचा मागोवा घेता येतो. दर महिन्याला काही सहलींवर महिलांची प्रत्यक्ष भेट मला फार महत्त्वाची वाटते. अर्थात महिलांच्या दिमतीला असलेले आमचे टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सपोर्टला असलेली आमची ऑफिस टीम सर्व काही साग्रसंगित ठरल्याप्रमाणे वल्हवून नेत असते. त्या त्या वुमन्स स्पेशलमधून अपेक्षेपेक्षा जास्त आनंद महिलांना मिळवून द्यायचा सर्वांचा मनःपूर्वक प्रयत्न असतो. त्यामुळे मला काम काही नसतं पण मग माझी जगभर भटकंती कशी सुरू राहणार? त्यामुळे वुमन्स स्पेशलच्या महिलांना किंवा सीनियर्स स्पेशलच्या ज्येष्ठांना भेटणं हा माझ्या स्वतःच्या भटकंतीचा-रीज्युविनेशनचा बहाणा आहे. ह्या सहलींवरचं आनंदी वातावरण एक वेगळी ऊर्जा देऊन जातं. याचसाठी केला होता अट्टाहास ह्या स्पेशल सहलींचा, त्याची कार्यपूर्ती होताना जेव्हा दिसते तेव्हा असंच सतत काहीतरी नविन्यपूर्ण करीत राहण्याचा उत्साह वाढतो. असो. तर अशाच एका वुमन्स डे स्पेशल सहलीला आलेल्या मैत्रिणींना भेटायला मी थायलंडला बँकॉकला होते. बँकॉक-पट्टायाची म्हणजे थायलंडची सहल ही बहुतेक वेळा बर्याच जणींची पहिली परदेशवारी असते. पहिला पासपोर्ट, पहिल्या व्हिसाचा पासपोर्टवरचा शिक्का, देशाबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल, पहिला इंटरनॅशनल विमान प्रवास ह्यासोबतच आपण एकटीने सुरक्षितरित्या प्रवास केल्याचा असीम आनंद प्रत्येकीच्या चेहर्यावरच नव्हे तर त्या वातावरणातच ओसंडून वहात होता. गप्पागोष्टी करीत असताना एका सखीने विचारलं, आता माझ्याकडे पासपोर्ट आहे. ह्या वुमन्स स्पेशलमधून मी एकटी प्रवास करू शकते हा आत्मविश्वास आलाय, ह्याच्या पुढची सहली मी कोणती करू? मी म्हटलं, चला म्हणजे सहल उत्कृष्ट झाली, तुम्हाला आवडली. वीणा वर्ल्ड टीमच्या प्रयत्नांचं सोनं झालं. तुमचा हा प्रश्न ऐकायला आमच्या टूर मॅनेजरचे कान आसूसलेले असतात. कारण हा प्रश्न म्हणजे टूर मॅनेजरच्या कामाची पावती असते. तुम्ही विचारलेला प्रश्न अनेकींच्या मनात असणार त्यामुळे सगळ्यांसाठीच त्याचं उत्तर मी देते म्हणत मी माईक हातात घेतला.
महिलांनी घराबाहेर पडावं, आपला भारत बघावा, जगाच्या सफरीवर आरूढ व्हावं, आपला दृष्टीकोन व्यापक बनवावा, स्वतःवर प्रेम करावं, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, नटण्या सजण्याच्या मनात दडून राहिलेल्या सुप्त इच्छा पूूर्ण कराव्यात ह्या विचारातून आली वुमन्स स्पेशल. गेल्या तेरा वर्षांत ह्या वुमन्स स्पेशलची वाढती संख्या आणि त्याला मोठ्या संख्येने येणार्या महिला बघून मला वाटतं की ही एक कमर्शियल सहल नाहीये तर ती एक गरज आहे आणि तुमच्या चेहर्यावरचा आनंद मला हे नेहमीच पटवून देत आलाय. आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास महत्त्वाचा. आता पुढची सहल कोणती करायची? कुठे जायचं? हा प्रश्न अनेकींच्या मनात असेल कारण आज ह्या सहलीचा शेवटचा दिवस आहे, थायलंडला आम्हाला हा प्रश्न विचारला जातोच, आणि त्याचं उत्तर आहे, युरोप किंवा लेह लडाख. इतक्या वर्षांत मी अनुभवलंय की ह्या पहिल्या सहलीनंतर कुणी दोन वर्षांतून एकदा तर कुणी वर्षातून एकदा तर कुणी सहा महिन्यांतून एकदा असा प्रवास करतात आणि तुम्हीही करणारच आहात. आवडीचा सवडीचा आणि बजेटचा प्रश्न असतो. माझा सल्ला असतो तो म्हणजे वर्षातून एकदा असा वेळ काढा. एक दिवसापासून पंधरा दिवसांपर्यंतच्या देशविदेशातल्या सहली असतात. आतातर वुमन्स स्पेशलच्या वीकेंड सहलीही आल्या आहेत. थोडीशी सेव्हिंगची सवय लावली तर बजेटही बनवता येतं, मी पाहिलंय दर महिन्याला बाजूला काढलेली दहा ते तीस टक्के बचत रक्कम जगप्रवासाचं स्वप्न पूर्ण करू शकते. नुसता आनंदच नाही तर आपलं व्यक्तीमत्व घडत जातं प्रवासात. मलाही आत्मविश्वास मिळत गेला तो आपल्या भारतातल्या आणि जगाच्या भ्रमंतीतूनच. म्हणूनच वाटतं की जसं जमेल तसं पण ठरवून पर्यटन करावं. समजा तुम्हाला असं दरवर्षी फिरणं नसेल शक्य होणार तरी आयुष्यात किमान तीन सहली कराच करा. पहिली जनरली असते ती थायलंड किंवा थायलंड सिंगापूर मलेशिया, दूसरी युरोप आणि तिसरी लेह लडाख. ही पहिली सहल तुम्हाला यस आय कॅनचा आत्मविश्वास देऊन गेली असेल निश्चितपणे. तसंच भारताबाहेरचं जग कसं आहे, इथली स्वच्छता, नियम, अटी, क्राउड मॅनेजमेंट, सोयी, सुविधा, आतिथ्य, सेवा देण्याची वृत्ती, त्यांचा त्यांच्या देशविषयीचा अभिमान ह्या सगळ्या गोष्टी या आठवड्यात बरंच काही देऊन गेल्या असतील. पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशन, कस्टम्स, बॅगेज, परदेश, परभाषा, परभोजन ह्याविषयीची भीती आता कुठच्याकुठे पळाली असेल. भारताबाहरचं जग कसं आहे त्याची तोडंओळख तुम्हाला झालीये. आता तुम्ही युरोप बघण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं बघा. युरोप इज अल्टिमेट. नयनरम्य, निसर्गसुंदर आणि अवर्णनीय. त्याची तुलना कोणत्याही दुसर्या खंडाशी होऊ शकत नाही. पर्यटनातला अनभिषिक्त सम्राट आहे युरोप. तिथे एकदा जायलाच हवं. पुर्वी पर्यटक एकदा युरोपला जायचे, आठ-दहा देशांची एकत्रितपणे एक सहल केली की आयुष्यभराचं युरोप होऊन जायचं. आता मात्र एक पर्यटक युरोपला आठ ते दहा वेळा जातोय एवढं युरोपचं महत्त्व वाढलंय. म्हणूनच तुमची पुढची सहल युरोपची असायलाच हवी. ते लक्ष्य ठेवूया समोर. वुई मस्ट हॅव समथिंग टू लूक फॉरवर्ड टू, ऑलव्हेज! मनात आणलं तर ते प्रत्यक्षात येईलच. आणि एक लाखाच्या जवळपासचं बजेटही पुरतं बरं का, आमची ह्याच बजेटमधली पाच दिवसांत पाच देश दाखवणारी सहलही आहे जर बजेट कंस्ट्रेंे्रट असेल तर नाहीतर दहा दिवसांच्या वरची कोणतीही युरोपची मल्टीकंट्री टूर तोंडओळख होण्यासाठी परीपूर्ण आहे. तुमच्याकडे वेळ किती आणि बजेट ह्यावर ते ठरवा. सो नेक्स्ट टाइम युरोपला जायचं पक्कं. मला खात्री आहे युरोपची सहल संपताना तुम्हाला पुढच्या सहलीचे वेध लागणार आहेत आणि ती सहल असणार आहे लेह लडाख. थायलंड सिंगापूर किंवा युरोपपेक्षा संपूर्णणे वेगळी सहल. गेली पाच वर्ष आम्ही फॅमिली टूर्ससोबत वुमन्स स्पेशल लेह लडाखच्या सहली आयोजित करतोय. दरवर्षी मी तीन वेळा लेह लडाखला जाऊन येते. मे महिन्यात एकदा, जुलैमध्ये कारगिल विजय दिवसाच्या वेळी दुसर्यांदा आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून, तिसर्यांदा. लेह लडाख हे एक तीर्थक्षेत्र आहे. तिथले रांगडे पहाड आपल्याला आपल्या यत्किंचितपणाची साक्ष देतात, तर तिथलं लोकजीवन आपल्याला पेशन्स शिकवतात. सीमेवर गस्त घालणार्या जवानांचं जग जवळून बघितलं की आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वार्थी-संकुचित जगाची जाणीव होते. सिंगापूर युरोपचा चकचकाट तुम्हाला इथे कुठेही नजरेत पडणार नाही. ती अपेक्षापण करायची नाही. पण इथलं अनोखं निसर्गसौंदर्य, पाण्याचे, मातीचे, डोंेंगरांचे, अधूनमधून दिसणार्या हिरवळीचे रंग जर आपल्याला टिपता आले, त्याचं अद्वितीय रूप डोळ्यात साठवता आलं, जवानांच्या भेटीतून निस्पृहता आणि निस्वार्थपणा किंचितसा जरी घेता आला, कधीतरी मिळणार्या इंटरनेटचा आनंद चाखता आला, मधूनच गायब होणार्या रस्त्यांमधून बंपी राइडचा अनुभव सोसता आला तर लेह लडाख ही सहल जगातली अद्वितीय सहल आहे. ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. लेह लडाख हे सर्वाथाने आधुनिक तीर्थक्षेत्र आहे ज्याची सहल प्रत्येकाने केलीच पाहिजे वर लिहिलेला सुविचार, वन्स डेस्टिनेशन इज नेव्हर अ प्लेस, बट अ न्यू वे ऑफ सीइंग थिंंग्ज! हा लेह लडाखसाठीच लिहिलाय असं मला वाटतं. लेट्स लूक अॅट द थिंग्ज डिफरंटली, लाईफ इज ब्युटीफुल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.