पूर्वी एखादी वस्तू घ्यायची तर दुकानात जाऊन असलेल्या किंमतीला घेऊन यायची किंवा जमलं तर थोडी घासाघीस करून पैसे कमी करून त्यात समाधान मानायचं. आता मात्र आपण प्रत्येक गोष्ट विकत घेताना दहा वेबसाईट्स उघडतो, कम्पेअर करतो आणि मग खरेदी करतो. ह्यात वेळ वाया जातो की वाचतो हा प्रश्न वादातित पण जगासोबत भारताचीही मानसिकता वेगाने बदलतेय हे निश्चित.
वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी आम्ही नव्याने केल्या त्यातली एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे ‘वीणा वर्ल्ड जंबो डिस्काउंट’. जंबो डिस्काउंटसाठी दोन गोष्टी कारणीभूत झाल्या एक म्हणजे जेवढं आधी बुकिंग तेवढी बुकिंग नंबर्सची शाश्वती आणि पुढच्या गोष्टी वेळेत करण्यासाठी सुलभता. पर्यटनक्षेत्रात मेगा डिस्काउंट ह्या संकल्पनेची सुरुवात मी खूप आधी केली होती. त्या बरहुकूम ‘मेगा डिस्काउंट’ म्हणजेच ‘जेवढं आधी बुकिंग कराल तेवढं जास्त डिस्काउंट’ ही संकल्पना वीणा वर्ल्डमध्ये सुरू राहिली. मेगा डिस्काउंट आणल्यावरही एक संवाद किंवा विवाद नेहमी व्हायचा आमच्या सेल्स काऊंटरवर आणि तो म्हणजे ‘आत्ता आम्ही सहलीचे पूर्ण पैसे भरले तर तुम्ही ह्या मेगा डिस्काउंटवर आणखी काही डिस्काउंट देणार का?’ आत्ता आमच्याकडे ‘आणखी काही’ असं स्पेशल डिस्काउंट जो विचारेल त्याला, अशी सोय नव्हती किंवा नाहीये. ‘जर आपण एकाला असं डिस्काउंट देऊ शकत असू तर सर्वांना का नाही हा प्रश्न होता’. जे करायचं ते सर्वांसाठी, त्यासाठी कुणाला कधी घासाघिस किंवा विनंती करायला लागू नये. बर्याच विचारमंथनातून पाच वर्षांपूर्वी वीणा वर्ल्डच्या युरोप सहली लाँच केल्या तेव्हा सहलीचे पूर्ण पैसे भरल्यावर मिळणारा ‘जंबो डिस्काउंट’ आम्ही लाँच केला आणि मेगा डिस्काउंटसोबत आणखी एक डिस्काउंट सर्वच पर्यटकांना मिळायला लागला. ह्या डिस्काउंटमध्ये बरेच पैसे वाचत असल्याने एका सहलीवरून दुसरी सहल-थोड्या जास्त दिवसांची सहल पर्यटक अपग्रेड करू लागले. सहल अपग्रेड होणं हा आहे जंबो डिस्काउंटचा महत्त्वाचा फायदा. त्याचं असं होतं की, काही पर्यटक साउथ ईस्ट एशियाच्या सिंगापूर मलेशिया ह्या सात दिवसांच्या किंवा सिंगापूर थायलंड ह्या आठ दिवसांच्या सहलीची चौकशी करताना, त्यांच्या मनात सुप्त इच्छा असते ती दहा दिवसांच्या सिंगापूर थायलंड मलेशिया ह्या तीन देशांच्या सहलीला जायची. ही इच्छा जंबो डिस्काउंटमध्ये पैसे वाचतात तेव्हा पूर्ण होऊ शकते. तेवढ्याच पैशात किंवा थोड्या फरकाने जर दोन ऐवजी तीन देश पहायला मिळणार असतील तर व्हाय नॉट? असा आमचाही सल्ला असतोच त्यांना. पर्यटकही मग जंबो डिस्काउंटचा फायदा घेतात आणि मिळून जाते त्यांना त्यांच्या मनातली सहल.
पर्यटनातल्या छोट्या छोट्या इच्छा-मागण्या पूर्ण करायला त्यातलं एक साधन व्हायला मला खूप आवडतं. सततच्या पर्यटनाचं आणि पर्यटकांशी असलेल्या संवादाचं, त्यांच्या आवडी-निवडी, इच्छांचं निरीक्षण करण्याचं, त्यातून नवनवीन संकल्पना आणण्याचं जे भाग्य आम्हाला मिळालंय नं ते क्वचितच कुणाला मिळालं असेल. म्हणूनच वीणा वर्ल्डसाठी आणि वीणा वर्ल्डच्या पर्यटकांसाठी जानेवारी महिना महत्त्वाचा असतो तो जंबो डिस्काउंट समर ऑफरसाठी. वीणा वर्ल्डकडे ह्या महिन्यात वर्षातलं सर्वात जास्त बुकिंग येतं म्हणून वीणा वर्ल्ड टीम प्रचंड उत्साहात असते, तर पर्यटकांना ह्या महिन्यात बुकिंग केल्यानंतर हजारो रुपये वाचविता येतात म्हणून पर्यटक खूश असतात. जेवढं आधी बुकिंग तेवढा जास्त फायदा हे आता पर्यटकांना पूर्ण ज्ञात आहे. विमान कंपन्यांच्या जाहिराती, हॉटेल्सचे अॅडव्हान्स बुकिंगचे रेट्स हे सगळ्याच ठिकाणी आपल्याला कमीत कमी किमतीत मिळू शकतात कारण अॅडव्हान्स बुकिंगमुळे मिळणार्या बिझनेसची गॅरंटी. पर्यटनसंस्था तरी त्याला कशा अपवाद असणार? आम्हालाही जेवढं आधी बुकिंग मिळेल तेवढं पुढची सर्व व्यवस्था तसेच व्हिसा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. तसं बघायला गेलं तर २०१९च्या समर व्हेकेशनच्या सहलींचं बुकिंग पर्यटकांनी मागच्या ऑगस्टपासूनच करायला सुरुवात केलीय. आपला कदाचित विश्वास बसणार नाही पण युरोप अमेरिका जपान ऑस्ट्रेलियाच्या शंभरहून अधिक सहली ऑलरेडी फुल्ल झाल्या आहेत. वीणा वर्ल्डच्या ऑफिसमध्ये येऊन तर बघा, अनेक सहलींना तुम्हाला ‘सोल्ड आऊट’चा बोर्ड लागलेला दिसेल. आम्ही पर्यटकांना सारखी घाई करतो ती ह्यासाठी, कधी कधी ती पर्यटकांना जाहिरात वाटत असेल पण ती वस्तूस्थिती आहेे हे मला नमूद करावंसं वाटतं.
आता बघूया ह्या जंबो समर ऑफरमध्ये नक्की काय आहे ते. वीणा वर्ल्डकडे इंडिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, जपान, चायना, साउथ ईस्ट एशिया, मॉरिशस, दुबई, श्रीलंका, साउथ अमेरिका, अंटार्क्टिका अशा अनेक सहलींसाठी डिस्काउंट असतात. प्रत्येक सहलीच्या वर्षभर पसरलेल्या किंवा सीझनप्रमाणे वेगवेगळ्या डीपार्चर डेट्स असतात. प्रत्येक डेटमध्ये तीस,चाळीस वा पन्नास अशा सीट्स असतात. ह्या सीट्सपैकी काही सीट्स अॅडव्हान्स बुकिंग डिस्काउंट देऊन लवकरात लवकर फुल्ल केल्या जातात. उरलेल्या सीट्स ह्या प्रत्येक सहलीचा ब्रेकइव्हन साधण्यासाठी कमी डिस्काउंटवर किंवा झिरो डिस्काउंटवर सेल केल्या जातात. एखादी सहलीची तारीख जर प्रमोशनल असेल तर त्यामध्ये सगळ्या सीट्स ह्या एकाच डिस्काउंटवर सेल केल्या जातात. पर्यटकांची डिमांड, एअरलाईनची डील्स, पर्यटनस्थळाचा सीझन, आपल्याकडच्या सुट्ट्या ह्यावर किती डिस्काउंट द्यायचं ह्याची लॉजिक्स ठरतात. अर्थात संपूर्ण कम्प्युटराईज्ड सिस्टीम असल्याने त्यामध्ये कुणालाच बदल करता येत नाही. जे काही डिस्काउंट देता येत असेल ते सर्वांना द्यायचं कोणत्याही रिक्वेस्टशिवाय किंवा कोणत्याही बार्गेनिंगशिवाय. त्यामुळे तुम्ही वीणा वर्ल्डच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये या, कोणत्याही सेल्स ऑफिसमध्ये जा किंवा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, गोवाच्या प्रीफर्ड सेल्स पार्टनरकडे किंवा ऑनलाईन बुकिंग केलंत तरी सहलीची किंमत तुम्हाला एकच असेल.
यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे मेगा डिस्काउंट म्हणजे सहलीची रजिस्ट्रेशन अमाऊंट भरली की मिळणारा अॅडव्हान्स बुकिंग डिस्काउंट आहेच. पण बुकिंगच्यावेळी जर सहलीचे पूर्ण पैसे भरले तर पर्यटकांना मिळेल मेगा+जंबो डिस्काउंट. आत्तापर्यंत समर व्हेकेशनमधल्या युरोप अमेरिका टूर्ससाठी सहा हजारांहून अधिक पर्यटकांनी असा जंबो डिस्काउंट मिळविलाय. यावर्षीची समर टूर्सच्या ऑफरची खासियत आहे ती म्हणजे, साउथ ईस्ट एशियातील सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मिडल ईस्ट मधील दुबई अबुधाबी आणि श्रीलंका, आफ्रिका, मॉरिशस तसेच भारतातील सर्व सहलींवर ३१ जानेवारीपूर्वी जर बुकिंग केलं तर मेगा डिस्काउंट+जंबो डिस्काउंट+पाच टक्के समर ऑफर डिस्काउंट आहे. म्हणजे जर सिंगापूर थायलंड मलेशियाची दहा दिवसांची सहल आपण उदाहरणादाखल घेतली तर त्या सहलीची मेगा डिस्काउंट टूर प्राईस आहे एक लाख पंचवीस हजार रुपये, संपूर्ण पैसे भरून ती सहल जर बुक केली तर जंबो डिस्काउंटने ती सहल मिळते एक लाख दहा हजार रुपयांत आणि त्यावर आणखी पाच टक्के हे डिस्काउंट धरलं तर सिंगापूर थायलंड मलेशियाची तीन देशांना भेट देणारी दहा दिवसांची स्थलदर्शनाने खचाखच भरलेली सहल जानेवारीमध्ये बुकिंग केल्यास तुम्हाला मिळते फक्त एक लाख चार हजार पाचशे रुपयांत. सर्वसमाविष्ट असलेल्या, कोणतेही छुपे खर्च नसलेल्या आणि आत्तापर्यंतच्या हजारो पर्यटकांनी गैरविलेल्या ह्या सहलीसाठी एवढी कमी किंमत म्हणजे ‘स्टील अ डील’. तुम्ही वीणा वर्ल्डसोबत आधी सहल केलेली असेल किंवा तुमचा स्वत:चा ग्रुप असेल आणि ग्रुपने एकत्र बुकिंग करीत असाल तर थोडासा अधिक फायदाही मिळेल.
ग्रुप टूर्ससाठी वीणा वर्ल्ड सर्वांना माहीत आहेच. पण स्वतंत्र्यरित्या जाणार्या पर्यटकांसाठी त्यांना हवे तसे त्यांच्या आवडीचे हॉलिडेज् बनविणारी स्पेशल तीस जणांची एक्सपर्ट टीम कार्यरत आहे, जगात कुठेही आणि केव्हाही रेग्युुलर तसेच लक्झरी- सुपर लक्झरी कस्टमाईज्ड हॉलिडेज् ते बनवून देतात. कस्टमाईज्ड हॉलिडेसाठीही ह्या ऑफरमध्ये ५% डिस्काउंट आहे. कॉर्पोरेट वर्ल्डसाठी इन्सेंटिव्ह टूर्स, डीलर्स मीट, अवॉर्ड फंक्शन्स ह्या गोष्टी करण्यात आणि माईस टूर्स आयोजित करण्यातही वीणा वर्ल्ड अग्रेसर आहे. व्हॅलेंटाईन डे स्पेशल, वुमन्स डे स्पेशल, चेरी ब्लॉसम स्पेशल सारख्या इव्हेंटफुल टूर्स पर्यटकांना त्याच डेस्टिनेशनचा जास्त आनंद देऊन जातात. आता तर डेस्टिनेशन वेडिंगही सुरू झालंय वीणा वर्ल्डमध्ये. अंडर वन रूफ सबकुछ.
वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हाच आम्ही आमचं ध्येय ठेवलं की ज्यांना प्रवासाचा श्रीगणेशा करायला जमलं नाही त्यांना किमान गोव्याला घेऊन जायचं, ज्यांनी थोडेफार जवळचे प्रवास केलेयत त्यांना शिमला मनाली, केरळसारख्या भारतातल्याच निसर्गरम्य स्थळी न्यायचं. ज्यांनी महाराष्ट्राबाहेर म्हणजे राज्याबाहेर पाऊल टाकलंय त्यांना साउथ ईस्ट एशिया किंवा दुबईला घेऊन जायचं आणि ज्यांनी परदेश प्रवासाचा श्रीगणेशा ऑलरेडी केलाय त्यांना युरोप-अमेरिकेसारख्या भव्य-दिव्य सफरी घडवायच्या. आत्तापर्यंत पाच वर्षांत जवळजवळ चार लाख पर्यटकांनी वीणा वर्ल्डसोबत पर्यटनाचा श्रीगणेशा केला. आहे की नाही जंंबो वाटचाल, जी चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्यासाठी, मोठी करण्यासाठी आम्हालाही सातत्याने जंबो परिश्रम करावे लागणार आहेत. आमची टीमही बाह्या सरसावून काम करतेय. सो पर्यटकहो, पासपोर्ट असेल तर तुमच्यासाठी वीणा वर्ल्ड जगभरातील छान छान सहलींचा नजराणा घेऊन सज्ज आहे आणि पासपोर्ट नसेल तर लेह लडाख-नॉर्थ ईस्टपासून, नेपाळ, भूतान, अगदी अंदमानपर्यंत आमची फौज आपल्या दिमतीला तयार आहे. तेव्हा चला बिनधास्त आणि कुटुंबासोबत साजरा करा उत्सव पर्यटनाचा.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.