‘व्हिसा’ मग तो कोणत्याही देशाचा असो तो मिळाला की प्रत्येकाला हुश्यऽऽऽ वाटतं. युएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युके हे व्हिसा मिळणं इतर देशांच्या व्हिसापेक्षा थोडंसं कठीण. त्यातल्या त्यात सर्वात जास्त भीती कोणत्या व्हिसाची वाटत असेल तर ती युएसए व्हिसाची. पण मला मात्र युएसए व्हिसा तेवढा कठीण वाटत नाही. अर्थात प्रोसेस नीट फॉलो केली पाहिजे हे आलंच, पण इंटरव्ह्यूच्याच वेळी ग्रँटेड की रीजेक्ट हा निर्णय होऊन जातो. जीव टांगणीला लागत नाही.
मागच्या आठवड्यात अमेरिकेची थोडीशी तोंडओळख करून घेतली होती आपण ‘अमेरिका अंटार्क्टिका’ ह्या पर्यटन मार्गदर्शक पुस्तकाच्या अनुषंगाने. त्याच्याच पुढे जाऊन अमेरिकेला जाणारा जो पर्यटक आहे त्याच्यासाठी पुढच्या वर्षी काय काय ऑप्शन्स आहेत ह्याचा आढावा घेतानाच युएसए व्हिसा संदर्भातही थोडक्यात माहिती मिळवूया.
आज ज्यांना कुणाला अमेरिकेला जायचं आहे त्यांना युएसए व्हिसा इंटरव्ह्यूसाठी दोन महिन्यानंतरची डेट उपलब्ध आहे. तसं बघायला गेलं तर सीझन संपलाय पण तरीही व्हिसाची डेट इतक्या दिवसानंतरची मिळत असेल तर पीक सीझन आणि सुपरपीक सीझनची गोष्टच न केलेली बरी. त्यामुळे ज्यांना-ज्यांना पुढच्या वर्षी अमेरिका वारी करायची आहे (अमेरिका हे आपल्या बोली भाषेतलं युएसएचं नामकरण) त्यांनी युएसए व्हिसा आत्ताच करून घ्या. आम्ही ह्या आठवड्यात ‘युरोप अमेरिका 2019’ चं बुकिंग सुरू करतोय तेही तेवढ्याचसाठी. वर मी म्हटल्याप्रमाणे, युएसए व्हिसाची भीती बाळगायचं कारण नाही, आमची नव्वद जणांची व्हिसा टीम बसलीय मार्गदर्शन करायला. अर्थात आमचं काम मार्गदर्शनाचं. ‘व्हिसा ग्रँट करणं’ हे संपूर्णपणे युएसए कॉन्स्युलेटच्या अखत्यारित. तिथे कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही, किंवा तसं जर कुणी क्लेम करीत असेल तर त्यावर कृपया विश्वास ठेवू नये. आमच्याकडेही सुधीरला किंवा सुनिलाला फोन येत असतात की, ‘तुमचं पत्र मिळू शकेल का? युएस व्हिसा करायचाय’, तर असं पत्राने काम होत नाही. ‘खरं बोला, कोणतंही मॅनिप्युलेशन करू नका आणि व्हिसा मिळण्याचे चान्सेस वाढवा’ हा आमचा अनुभवी सल्ला. युएसए व्हिसा काढायचाय म्हटलं की आपल्याला हजार सल्ले ऐकायला मिळतात. ‘तुम्ही असं बोला, असं सागू नका, हे दाखवूच नका’... एक ना अनेक. त्याने हायसं वाटण्याऐवजी गोंधळून जायला होतं. त्यामुळे व्हिसा प्रोसेस फॉलो करा. आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू द्या. तिथल्यातिथे निर्णय झाल्याने आपण टेन्शन फ्री.
सर्वसाधारण पर्यटकासाठी लागणारी युएसए व्हिसाची कार्यपद्धती आता जाणून घेऊ या. टूरिस्ट म्हणून अमेरिकेला जायचं असेल तर सर्वप्रथम B1/B2 हा व्हिसा मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. ह्या व्हिसासाठी वीणा वर्ल्ड तुमच्यातर्फे ऑनलाईन अर्ज करते. त्यासाठी पर्यटकांनी आम्ही दिलेल्या यूएसए नॅनो फॉर्ममध्ये त्यांची संपूर्ण माहिती अचूक देणं आवश्यक आहे, सांगितल्याप्रमाणे सपोर्टिंग डॉक्यूमेंट्स योग्य जोडणं गरजेचं आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पर्यटकांना बायोमेट्रिक आणि व्हिसा इंटरव्ह्यूसाठी जावं लागतं. त्यासाठी लागणार्या अपॉइंटमेंटच्या डेट्स वीणा वर्ल्डतर्फे घेतल्या जातात. बायोमेट्रिकची डेट लगेच मिळत असली तरी इंटरव्ह्यूसाठी एक महिन्यानंतरची डेट मिळते. इंटरव्ह्यूवरच यूएसएचा व्हिसा ग्रॅन्ट होणं अवलंबून असतं. १४ वर्षाखालील मुलांना आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सीनियर्सना युएस व्हिसासाठी बायोमेट्रिक आणि इंटरव्ह्यूची आवश्यकता नाही. जर तुमचा युएसए व्हिसा रीन्यू करण्यासाठी जानेवारी २००८ नंतर इश्यू झाला असेल तर तुम्हाला बायोमेट्रिक आणि इंटरव्ह्यूची आवश्यकता भासणार नाही. युएस व्हिसा काढण्यासाठी इतर बहुतेक सर्व व्हिसासाठी एअर तिकीट लागतं ते इथे लागत नाही, तसंच व्हिसा किती दिवस आधी करावा अशी दिवसांची मर्यादाही नाही त्यामुळे पुढच्या वर्षाच्या अमेरिकन पर्यटनासाठी आपण आत्ताच व्हिसा करून ठेवू शकतो. बहुतेक करून युएसए व्हिसा ग्रँट झाला तर तो दहा वर्षांसाठी असल्याने अनेकवेळा युएसएला जाता येतं. तसंच युएस व्हिसा असेल तर मेक्सिको, बहामाज, कॉस्टा रिका, पनामा, मॉन्टेनेग्रो, जॉर्जिया, तैवान, फिलिपाईन्स ह्या सारख्या अनेक देशांना व्हिसा लागत नाही किंवा काही देशांना ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो, युएसए व्हिसा पासपोर्टवर असणं हे किती महत्वाचं आहे हे ह्यावरून आपल्याला कळेल. युएस व्हिसा पासपोर्टवर असला किंवा तुमची युएस वारी झालेली असली की इतर देशांचे व्हिसा मिळायलाही बर्यापैकी सोप्पं जातं हा आमचा अनुभव. तर अमेरिकेला जाण्याासाठी उत्सुक असलेली पर्यटक मंडळी, चला लागा तयारीला युएसए व्हिसाच्या.
अमेरिका हे एक मॅनमेड वंडर आहे. जवळपास अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेला, जगभरातील सर्व जाती -जमाती, धर्म, पंथांना सामावून घेणारा, सर्वांचं स्वातंत्र्य जपणारा आणि सतत जगाच्या पुढे राहीलेला, जगावर दबाव ठेवणारा देश जगातल्या प्रत्येकाला खुणावत राहतो ह्यात आश्चर्य नाहीय. बरं आपलीही आप्तमंडळी तिथे ठाण मांडून बसलीयत, म्हणजे आपली पाळंमुळं नाहीत तर आपलं भविष्य ह्या देशात वास्तव्याला आहे त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने अमेरिका वारी ठरलेलीच. मग अमेरिकेला जायचंच आहे तर ते कसं जावं हे आता बघूया.
आत्तापर्यंतच्या आमच्या अनुभवाप्रमाणे अमेरिका सहलीला जाणार्या पर्यटकांमध्ये साठ टक्के पर्यटक हे सहल संपल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे राहतात आणि चाळीस टक्के पर्यटक हे भारतात परत येतात. आमच्या ट्रॅव्हल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्यांचं ‘शेड्यूल्ड टूर गेस्ट’ आणि ‘डिव्हिएशन गेस्ट’ असं नामाभिधान करतो. त्यामुळे इथे मीही ह्या दोन प्रकारच्या पर्यटकांनी त्यांच्यासाठी सहली कशा निवडाव्या त्याविषयी लिहीते.
‘शेड्यूल्ड टूर गेस्ट’ हा बहुतकरून पहिल्यांदा अमेरिकेला जाणारा पर्यटक असतो. त्यामुळे त्याने अमेरिका एका फटक्यात जेवढी जास्त कव्हर करता येईल तेवढी करावी. भारतीय पर्यटकांना आवडणारी अमेरिका (USA) ही ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, शिकागो, ओरलँडो-नासा, बहामाज ह्यामध्ये विभागली गेलीय. म्हणजे किमान एवढं तरी पहावं ही पर्यटकांची इच्छा असते, किंवा ते एक स्वप्न असतं आणि म्हणूनच ह्या सर्वांना एकत्रितपणे सामावून घेणारी अमेरिकन ड्रीम ही एकोणीस दिवसांची सहल आम्ही गेली पाच वर्ष पर्यटकांना देतोय, आणि बरेच पर्यटक अवाढव्य युएसएचा बराचसा भाग ह्या सहलीद्वारे बघून पूर्ण करतात. ह्याच ‘शेड्यूल्ड टूर गेस्ट पर्यटकांमध्ये, एवढे एकोणीस दिवस आमच्याकडे नाहीत, एक पंधरा-सोळा दिवस आम्ही काढू शकतो’ म्हणणारे पर्यटक असतात त्यांच्यासाठी आम्ही सोळा दिवसांची ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, शिकागो,
माऊंट रशमोर आणि येलो स्टोन नॅशनल पार्कची अमेरिकन ज्वेल्स ही सहल आणलीय. तसंच डिस्नी प्रेमींसाठी ईस्ट कोस्ट- वेस्ट कोस्ट ओरलँडो आणि नासा अशी पंधरा दिवसांची अमेरिकन वंडर्स ही सहल आहे. ज्यांच्याकडे पंधरा दिवसही नाहीत त्यांना ईस्ट कोस्ट-वेस्ट कोस्ट शिकागो अशी तेरा दिवसांची अमेरिकन मॅजिक ही सहल आम्ही सुचवतो. आणि ज्यांना फक्त अमेरिकेची तोंडओळख करून घ्यायचीय त्यांच्यासाठी युएसए ईस्ट कोस्ट किंवा युएसए वेस्ट कोस्ट अशा सात-सात दिवसांच्या सहली आयोजित केल्या आहेत. ह्या सहा सहली अमेरिकेला जाणार्या पर्यटकांच्या आवडी-निवडी ध्यानात घेऊनच केल्यामुळे त्यांना दरवर्षी खूप चांगला रीस्पॉन्सही मिळतो.
‘डिव्हिएशन गेस्ट’ ही अमेरिका सहल करणार्या पर्यटकांची मोठी कॅटॅगरी. आपल्या प्रत्येक भारतीयाचं अमेरिकेत कुणी ना कुणी आहे. त्यांचं सततचं बोलावणं असतं आणि आपल्यालाही जायचं असतं अर्थात ही सर्व मंडळी तिथे त्यांच्या कार्यबाहुल्यात डॅम बिझी, कामाच्या घाण्याला जुंपलेले. वेळ कुठे असतो आपल्याला अमेरिका दाखवायला. जे काही अमेरिका बघणं होतं ते वीकेंड्सना आणि तेही जवळपासचं, त्यामुळे तिथल्या आप्तांचा आणि आमचाही असा सल्ला असतो की, एकोणीस दिवसांपासून सात दिवसांपर्यंतच्या सहलीतली कोणतीही सहल निवडा, आधी अमेरिका बघा आणि मग आपल्या आप्तांकडे जा. ह्याने दोन फायदे होतात. सहलीच्या आखीव रेखीव कार्यक्रमामुळे रीतसर अमेरिका बघून होते आणि आप्तांनाही टेन्शन राहत नाही किंवा गिल्टी वाटत नाही की ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत म्हणून. आणखीही एक गोष्ट सांगाविशी वाटते ती म्हणजे, जर तुमचे नातेवाईक ईस्ट कोस्टला राहत असतील आणि ते तुम्हाला संपूर्ण ईस्ट कोस्ट दाखविणार असतील तर तुम्ही वेस्ट कोस्टची सात दिवसांची टूर जॉईन करा. जर तुमचे नातेवाईक वेस्ट कोस्टला राहत असतील आणि ते तुम्हाला जर संपूर्ण वेस्ट कोस्ट दाखविणार असतील तर तुम्ही वीणा वर्ल्डची ईस्ट कोस्टची टूर करून त्यांच्याकडे राहायला जा. कॉम्बिनेशन्स खूप करता येतील. आमची सेल्स टीम तुम्हाला त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करायला हजर आहे.प्रत्येक सेल्स ऑफिसमध्ये, प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन तुम्ही बुकिंग करणार असाल तर त्यासाठीही डेडीकेटेड ऑनलाईन टीम आहे तुमच्या दिमतीला.
ज्यांची युएसए टूर झालीय पण दहा वर्षांचा व्हिसा आहे त्यांच्यासाठी मेक्सिको, अलास्का, हवाई, अनसीन अमेरिका बाय रोड, अशी कॉम्बिनेशन्स आम्ही 2019 मध्ये आणलीयेत. कॅनडा, साउथ अमेरिका, अंटार्क्टिका ह्या सहलीही जाहीर होत आहेत लवकरच. वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या अमेरिका सहली तर खूपच लोकप्रिय झाल्यात. परवा मी ह्या दोन्ही सहलींच्या अमेरिकेला गेलेल्या पर्यटकांना भेटायला वॉशिंग्टन आणि लॉस ऐंजिलीसला निघतेय.
सो पर्यटकमंडळी लक्ष ठेवा, लवकरच जाहीर करतोय ‘युरोप अमेरिका 2019’चं बुकिंग. ‘जेवढं लवकर बुकिंग तेवढा जास्त फायदा’, हे आता सर्वश्रृत आहेच. सो चलो, बॅग भरो, निकल पडो! ह्यावेळी अमेरिका वारी.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.