प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी आहे वीणा वर्ल्ड. थोडक्यात फॅमिलीसाठी ग्रुप टूर्स किंवा कस्टमाईज्ड प्रायव्हेट हॉलिडेज्, न्युली मॅरिड कपल्ससाठी हनिमून टूर्स, महिला-मुलींसाठी वुमन्स स्पेशल, ज्येष्ठांसाठी सीनियर्स स्पेशल, आजी आजोबा नातवंडांसाठी ग्रँड पॅरेंट्स-ग्रँड चिल्ड्रन स्पेशल, मुलगा-सून वा मुलगी-जावई मिड एज् कपल्ससाठी ज्युबिली स्पेशल, स्वतंत्र विचारसरणीच्या तरुणाईसाठी सिंगल्स स्पेशल तसेच...
आम्ही मुलांना घेऊन बर्याचदा तुमच्यासोबत गेलोय पण ह्यावेळी आमच्या सिल्व्हर ज्युबिली ईयरमध्ये फक्त दोघांनाच कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन राहायचंय, तुम्ही असं नुसतं दोघांसाठीच आम्हाला बुकिंग करून द्याल का? अशातर्हेचा प्रश्न हा कोणत्याही समारंभात किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर विचारला जातो. बर्याचजणांना माहीत नसतं की आम्ही ग्रुप टूर्ससोबत आणखी बर्याच गोष्टी करीत असतो. अर्थात ग्रुप टूर्सच्या मोठ्या जाहिराती, देशविदेशातील कोणत्याही पर्यटनस्थळी दिसणारे ग्रुप्स आणि त्यांच्यासोबत डौलाने झेंडा फडकवणारे वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स ग्रुप टूर्स म्हणजे वीणा वर्ल्ड हे समीकरण सर्वांच्या मनात घट्ट करून टाकतात. अर्थातच ग्रुप टूर्ससाठी मोठी टीम काम करतेय पण इंडिव्हिज्युअली जाणार्या पर्यटकांना त्यांचा हॉलिडे त्यांना हवा तसा- त्यांच्या मनासारखा करून देण्यासाठी वीणा वर्ल्डमध्ये पन्नास जणांची टीम कार्यरत आहे हे कुणाला माहीत नाही तसंच कॉर्पोरेट वर्ल्ड-छोट्या संस्था-मल्टिनॅशनल्स ह्यांच्यासाठी माईस टूर्स करणारी पन्नास जणांची टीम आहे हे ही खूप कमी जणांना माहीत आहे. आता पर्यटनाचा मोठा सीझन सुरू होईल. आपल्या भारतातील समर व्हेकेशन अनेक देशांच्या टुरिझमचं मोठं लक्ष्य बनलीय त्यामुळे पर्यटनाला जाणार्या प्रत्येकाला ते कशातर्हेने आणि कसं कसं पर्यटन करू शकतात, वीणा वर्ल्ड प्रत्येक पर्यटकासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी त्यांच्या पर्यटनाच्या गरजेसाठी काय काय करू शकते ह्यासाठी आजच्या ह्या लेखाचा प्रपंच.
पर्यटक, पर्यटनस्थळ, फेस्टिव्हल्स, स्पेशल इंटरेस्ट, छुट्टीयों का मौसम ह्या गोष्टी नजरेसमोर ठेवून किंबहुना ह्यावरच वीणा वर्ल्ड स्ट्रॅटेजी आखली जाते. पर्यटक हा सर्वात महत्त्वाचा घटक. त्या पर्यटकावर तर आम्ही सतत आमचं लक्ष केंद्रित केलेलं असतं. प्रत्येक कुटुंबासाठी पर्यटनाची काय काय गरज असू शकते ह्याचा सततचा विचार-त्यावरची चर्चासत्र, आणि देशविदेशातील पर्यटकांचं निरीक्षण ह्यातून निर्माण झाल्या अनेक नवनवीन संकल्पना ज्यांनी पर्यटनक्षेत्रात क्रांती घडवली. फॅमिलीसाठी ग्रुप टूर्स किंवा कस्टमाईज्ड प्रायव्हेट हॉलिडेज्, न्युली मॅरिड कपल्ससाठी हनिमून टूर्स, महिला-मुलींसाठी वुमन्स स्पेशल, ज्येेष्ठांसाठी सीनियर्स स्पेशल, आजी आजोबा नातवंडांसाठी ग्रँड पॅरेंट्स-ग्रँड चिल्ड्रन स्पेशल, मुलगा-सून वा मुलगी-जावई मिड एज् कपल्ससाठी ज्युबिली स्पेशल, स्वतंत्र विचारसरणीच्या तरुणाईसाठी सिंगल्स स्पेशल तसेच वीकेंड स्पेशल्स, अॅग्रो टूर्स, कॉस्ट सेव्हर टूर्स, रेग्युुलर टूर्स, लक्झरी टूर्स, कस्टमाईज्ड हॉलिडेज्, माईस कॉर्पोरेट टूर्स, भारताबाहेर राहणार्या भारतीयांसाठी व फॉरिनर्ससाठी भारतातल्या टूर्स आणि कस्टमाईज्ड पॅकेजेस असे अनेक प्रकार आम्ही पर्यटन क्षेत्रात रुजवून 365 डेज् पर्यटन सर्वाथाने सुरू केलं.
पर्यटनस्थळं हा आमच्या स्ट्रॅटेजीमधला दुसरा घटक. पर्यटनस्थळांशिवाय पर्यटक अपूरा आहे, पर्यटन अशक्य आहे आणि आता तर पर्यटन एवढं वाढलंय की पर्यटनस्थळं अपूरी पडायला लागली आहेत. ह्याचं उदाहरण द्यायचं तर युरोपचं देता येईल, पूर्वी पर्यटक आयुष्यभरात पाच विदेश सहली करायचे. प्रथम साउथ ईस्ट एशिया, नंतर युरोप, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, त्यानंतर आफ्रिका. फुल्ल स्टॉप. आयुष्यभराचं पर्यटनस्वप्न इतकं मर्यादित स्वरूपात होतं. दोन विदेशवारींमध्ये चार-पाच वर्षांचं अंतर असायचं. हॉलीवूड-बॉलीवूड, सोशल मीडिया, फ्रेंड्स अॅन्ड फॅमिलीज् आणि पर्यटन कंपन्या ह्यांच्यामुळे पर्यटनस्थळांची लोकप्रियता आणि तिथे जायची उर्मी इतकी वाढलीय की आजच्या घडीचा पर्यटक दरवर्षी विदेशवारी करण्याचं स्वप्न बघतो. युरोप ह्या लोकप्रिय पर्यटन खंडाचं उदाहरण घेतलं तर पूर्वी आयुष्यात एकदा युरोपला जायचंय ही एक प्रबळ इच्छा असायची. एकावेळी दहा बारा पंधरा देश एका फटक्यात बघून घ्यायचे की झालं, असं असायचं. आज आमच्याकडे एक पर्यटक नऊ वेळा युरोपला जातोय इतकं ह्या पर्यटनखंडाने पर्यटकाला मोहात पाडलंय. पहिल्यांदा युरोप कसा आहे हे जाणण्यासाठी पर्यटक किमान चार-पाच देश एकत्र असलेली सहल घेतो, दुसर्यांदा हा पर्यटक स्कॅन्डिनेव्हियाला भेट देतो. तिसरी युरोप स्वारी असते ती व्हिएन्ना प्राग बुडापेस्ट पोलंड असं सेंट्रल युरोप बघण्याची. चौथ्यांदा पर्यटक स्पेन पोर्तुगाल मोरोक्कोकडे मोर्चा वळवतो. पाचवी युरोपची हाक असते ती महासत्तेकडून - रशियाकडून, सहावी युरोप टूर साहेबांच्या इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंडची तर सातवी युरोप स्वारी ईस्टर्न युरोपची-अचानक आपल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय झालेल्या क्रोएशिया-स्लोव्हेनियाची आणि नववी भेट असते ती ग्रीस टर्कीला. आणखी अजून एक दहावं युरोपियन स्वप्न पर्यटकांमध्ये डोकं वर काढायला लागलंय ते आईसलँड. एक पर्यटनस्थळ-खंड कोट्यावधी पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतो तो असा. आपला भारतही तेवढ्याच पोटेन्शियलचा आहे. पण अजूनही विदेशी पर्यटक त्यांच्या लिस्टमध्ये भारतात एकदाच भेट द्यायचं स्वप्न बाळगतो हे चित्र बदलायला हवं, आम्हीही त्यात आमचं योगदान दिलं पाहिजे.
आमच्या स्ट्रॅटेजीचा तिसरा घटक असतो तो म्हणजे फेस्टिव्हल्स आणि इव्हेंटस. वाराणसीचा कुंभमेळा, कारगिलचा विजय दिवस, जगन्नाथपुरीचं सँड आर्ट फेस्टिव्हल, जपानचा चेरी ब्लॉसम, स्पेनचा ला-टोमाटिना फेस्टिव्हल, मिडनाइट सन किंवा नॉर्दन लाइट्ससारखे निसर्गाचे उत्सव, हरबीन फेस्टिव्हलच्या वेळी चायनामध्ये उभारली जाणारी वंडरफुल स्नो सिटी अशा अनेक गोष्टी आम्ही देशविदेशात शोधत राहतो कारण पर्यटकांची ही मागणी वाढायला लागलीय. एक देश पर्यटकांना एकदाच नव्हे तर अनेक वेळा आपल्याकडे खेचू शकतो ह्याचं उदाहरण वीणा वर्ल्डचे हितचिंतक-पर्यटक श्री प्रकाश दिवाकर ह्यांचं देता येईल. त्यांनी जपानला तीन वेळा पर्यटक म्हणून भेट दिली. पहिल्यांदा ते जपान चायना कोरीया ह्या सहलीला आले. नंतर त्यांना चेरी ब्लॉसमवालं जपान बघायचं होतं म्हणून त्यांनी चेरी ब्लॉसमच्या सीझनमध्ये जपानला भेट दिली आणि नंतर अल्पाईन रुट असलेली जपानची सहल केली. जपानला चेरी ब्लॉसम, अल्पाईन रुट, ऑटम कलर्स किंवा स्नोई जपान इन ख्रिसमस अशा नैसर्गिक चमत्कारांसाठी भेट देणारे पर्यटक वाढताहेत. आत्ता वुमन्स डे ला एक हजारहून अधिक महिलांना आम्ही ND स्टुडिओची टूर घडवली. फेस्टिव्हल्स आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते असे.
चौथा भाग असतो तो स्पेशल इंटरेस्टचा. कुणाला वाईल्ड लाईफ आवडतं तर कुणाला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट असतो. कुणी म्युझियम लव्हर असतं तर कुणी अतिप्राचीन संस्कृतींमध्ये रस घेतो. अशा इंटरेस्टसाठी जगात असंख्य गोष्टी आहेत ज्या आनंदासाठी- अभ्यासासाठी - फोटोग्राफीसाठी खुणावत राहतात. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी एक्झिबिशन्स सुरू असतात, मेडिकल - अॅग्रीकल्चरल - आर्किटेक्चर - इंटीरियर्स - फार्मास्युटिकल्स... अशा ठिकाणी त्या त्या इंटरेस्टवाल्या पर्यटकांना किंवा प्रोफेशनल्सना घेऊन जायचं काम आम्ही करीत असतो. मग ते एखाद्या टूरचं आयोजन करून, इंडिव्हिज्युअल्ससाठी कस्टमाईज्ड पॅकेज बनवून किंवा एखाद्या कंपनीसाठी माईसची टूर बनवून. ज्याला जे हवं ते तसं ट्रॅव्हल पार्टनर म्हणून बनवून देणं हे आमचं काम मुख्यत्वेकरून.
पाचवी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शाळांच्या सुट्ट्या आणि लाँग वीकेंड्स किंवा जस्ट वीकेंड्स. सुट्टी लागली रे लागली की बाहेर पळायचं हे तसं बघायला गेलं तर वेस्टर्न कल्चर. पण आता आपल्याकडेही त्याचं पेव फूटलंय नव्हे क्रेझ आलीय. आमच्यासाठी अर्थातच ती चांगली गोष्ट आहे. मग आम्हीही अगदी एक दिवसाच्या पिकनिकपासून एक महिन्याच्या सहलीपर्यंतचे ऑप्शन्स पर्यटकांना देत असतो. आजकाल गणपतीच्या उत्सवात असलेली पाच दिवसांची सुट्टीसुद्धा पर्यटकांना दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर देशविदेशात कुठेतरी छोटी मोठी टूर हवीय ही मागणी घेऊन आमच्याकडे आणतेे. आम्हाला ह्या सहली मग द्याव्याच लागतात.
तर मंडळी एकंदरीत असं आहे उत्सवी पर्यटन किंवा पर्यटनाचं उत्सवीकरण. काहीही असो आम्ही त्यात महत्त्वाची कामगिरी बजावतोय हे महत्त्वाचं. पर्यटनाय नम:!
नमस्कार ,
मी तुमचे लेख नेहमी वाचतो . मला आवडलेले लेखांचा प्रिंट घेऊन ते माझ्या संग्रहात ठेवले आहेत . मला १० कमांटमेन्ट हा लेख वाचायला मिळाला
नाहीये. तसेच तुमचे केसरीत असताना लिहिलेले लेख मला कुठे मिळू शकतील ते मी लोकसत्ता मध्ये वाचायचो . ते लेख मला मिळाले तर ते मी
माझ्या संग्रहात ठेवायला हवे आहेत .
आपल्या कडून प्रतिसादाची अपेक्षा आहे .
कळावे
संजय चुनेकर ,
Thank You