व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. आपल्या घरात किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जरी एक नजर टाकली तरी वेगवेगळे प्रकार आणि तर्हा दिसतील, डिफरन्सेस असतील, कुणाला सगळ्या गोष्टी सुनियोजित एकदम वेलप्लॅन्ड पद्धतीने करायला आवडतात तर काहींचा प्लॅनिंग ह्या गोष्टीशी सुतराम संबंध नसतो. जो होगा सो देखा जायेगा किंवा लेट्स मीट द सरप्राईजेस अशी त्यांची धारणा असते. आपले पर्यटक नेमके कोणकोणत्या प्रकारात येतात ह्यावर विचार केला तेव्हा बरंच काही समोर आलं आणि त्यातूनच उदयाला आली एक संकल्पना...
एकता में विविधता आपल्या भारताविषयीच्या अनेक घोष वाक्यांमधलं हे एक घोषवाक्य मला फार आवडतं. देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीही ही विविधता, वेगळेपण, निराळेपण जर आपल्याला जपता आलं तर सर्वांचा आनंदी सुखशांतीचा मार्ग अजून सुकर होईल. मी तुझ्यापेक्षा वेगळा आहे आणि तू माझ्यापेक्षा वेगळी आहेस पण आपल्या दोघांची तीच शक्ती आहे हे जेव्हा उमगतं तेव्हा डिफरन्सेस सीनर्जीमध्ये बदलून जातात. आव्हानं पेलण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते. लिहिता लिहिता मला वेगळाच विषय मिळाला हा, आवडीचा, त्यावर कधीतरी लिहिनच पण आजचा विषय मुख्यत्वेकरून आमच्या पर्यटकाचा आहे. पर्यटकांमधले वेगवेगळे पैलू जेव्हा अभ्यासायला घेतले तेव्हा अॅक्च्युअली व्यवसाय वाढायला लागला. पर्यटक म्हणजे आमचे ग्राहक-कन्झ्युमर्स. हा शब्द मला आवडत नाही. त्यात खूप कोरडेपणा आहे. व्यवस्थापनाच्या भाषेत ठीक आहे पण वीणा वर्ल्ड आणि पर्यटक ह्यांचं नातं हे ग्राहक ह्या संकल्पनेच्या पलिकडलं असावं, त्यात आपलेपणाचा ओलावा असावा ह्यासाठी आमची धडपड, अहोरात्र प्रयत्न आणि तेच आमचं लक्ष्य. ते गाठायला अजून बराच अवधी आहे किंवा ते शंभर टक्के कधीच गाठता येणार नाही कारण एकदा निर्माण करून ठेवलं म्हणजे झालं अशी ती गोष्ट नाहीये. रोज क्षणाक्षणाला त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहिलं पाहिजे. त्या तर्हेची मनःस्थिती आणि संस्कृती घडविण्याचं काम सुरू आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात सातत्य राखल्याने लक्ष्याकडे घेऊन जाणार्या मार्गावर आम्ही जलद गतीने वाटचाल करतोय ही समाधानाची गोष्ट आहे.
पर्यटकांच्या घरातच आम्हाला इतकी एकता में विविधता बघायला मिळते की काही विचारू नका. भारतीय कुटुंबसंस्थेचं एक आदर्श चित्र डोळ्यासमोर आणलं तर त्यात दोन्हीकडचे आजी-आजोबा म्हणजे नाना-नानी, दादा-दादी, मुलगा-सून किंवा मुलगी-जावई, नातवंडं ह्यांचा समावेश असतो. एक्स्टेंडेड फॅमिलीजमध्ये मामा-मामी, काका-काकी, चुलत-मामे भावंडांची वर्णी लागते. आपल्या भारतात ह्या नातेसंबंधाची वीण अजूनही बर्यापैकी घट्ट आहे, ह्या सगळ्याची आपल्याला गरज आहे आणि तीच आपली शक्ती आहे. ह्याच कुटुंबावर वीणा वर्ल्ड जगतंय, त्या कुटुंबातल्या वैविध्यामुळेच वीणा वर्ल्ड वाढतंय. पंधरा वर्षांपूर्वीपासून ह्या कुटुंबचित्राचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि एकामागोमाग एक बरंच काही नवीन निर्माण करता आलं. सतत उत्साही राहता आलं. घरातल्या ज्येष्ठ मंडळींना हवा असतो संवाद आणि सहवास, ज्यातून निर्माण झाली सीनियर्स स्पेशल. घरातल्या मुलींना हवं होतं एक स्वतःचं मोकळं आकाश, त्यासाठी निर्माण झाली वुमन्स स्पेशल. यंग फॅमिलीजना हवा असतो एक ब्रेक त्यांच्यासारख्याच फॅमिलीजसोबत, मुलांना मुलं हवी असतात खासकरून परीक्षांनंतरच्या धम्मालीसाठी, त्यासाठी फॉरेव्हर स्ट्राँग फॅमिली टूर्स आहेतच. बदलत्या जीवनशैलीत स्वतंत्र विचार प्रवृत्ती वाढीस लागून सिंगल्स ही वेगळीच फळी निर्माण झाली आणि त्यासाठी आल्या सिंगल्स स्पेशल. मोठी कुटुंब कालप्रवाहात छोटी व्हायला लागल्यावर सगळ्या नातेवाईकांनी वर्षा-दोन वर्षातून एकदा एकत्र येऊन एकत्रितपणे सहलीला जायचा कल वाढायला लागला आणि आम्ही अशा कौटुंबिक ग्रुप्ससाठीही वेगळ्या सहली द्यायला सुरुवात केली. यू नेम इट, वुई हॅव इट ह्या संस्थेच्या मानसिकतेमुळे पर्यटनात तुम्हाला काय हवंय ते सांगा, आम्ही देतो हे वीणा वर्ल्डचं चित्र निर्माण झालं. म्हणूनच तरं कस्टमाईज्ड हॉलिडेज्, माईस टूर्स, डेस्टिनेशन वेडिंग ह्यामध्येही आम्ही यशस्वी झालो.
आवडीप्रमाणे सहली हा एक भाग झाला पण सवयींप्रमाणे पद्धती ह्यावर वीणा वर्ल्ड झाल्यावर जास्त विचारमंथन केलं. कदाचित ती त्यावेळी गरज होती. आपल्याकडे पर्यटक कसे येणार हे मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त चांगली सहल हे घोषवाक्य झालं आणि सप्तखंडातल्या सहलींसाठी अफोर्डेबल टूरिझमद्वारे वीणा वर्ल्ड नावारुपाला आलं. सहल कार्यक्रम, किमती, सर्व्हिस ह्या बाबतीत वीणा वर्ल्ड बेंचमार्क बनलं संपूर्ण भारतीय पर्यटनक्षेत्रात आणि किमतींवरही नियंत्रण आलं ही पर्यटकांच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली. पर्यटकांमध्ये सहलींपूर्वी नेमकं काय घडतं ह्या विचारमंथनात असं दिसून आलं की काही पर्यटकांना पर्यटनात जराही रस नसतो. कपलमध्ये एक जण असा असला की दुसर्या पर्यटनप्रेमीची इच्छा आपोआप दबली जाते. अर्थात सिंगल्स, सीनियर्स किंवा वुमन्स स्पेशलमुळे त्यांची आता सोय झालीय ही गोष्ट वेगळी. काही पर्यटकांच्या बाबतीत पर्यटन हा अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षणाच्या पुढे तेवढाच महत्त्वाचा भाग असतो. ही पर्यटनप्रेमी मंडळी आपल्या महत्त्वाच्या स्वप्नांसोबत जगभम्रंती करायचं, अमुक एक देश बघायचं स्वप्न उराशी बाळगतात. त्यांचं एक इच्छाचित्र मनःपटलावर कोरुन ठेवतात. त्याप्रमाणे पैशाचं नियोजन करतात. ही मंडळी व्यवस्थापनकुशल ह्या प्रकारातली असतात. सगळं काही वेळच्यावेळी ठरवून पार पाडायला त्यांना आवडतं. वेल प्लॅन्ड- मोस्ट ऑर्गनाईज्ड अशी ही मंडळी. त्यांच्या त्या वेल प्लॅन्ड गोष्टीला आम्ही सेव्हिंंग्जची दिशा दिली आणि जंबो डिस्काउंट प्रकार आणला. जेवढं आधी बुकिंग कराल तेवढी पैशाची बचत तसचं काही बेनिफिट्सचे ते हकदार. ह्या गोष्टीला पर्यटकांनी उचलून धरलं आणि गेली पाच वर्ष जंबो डिस्काउंटची लोकप्रियता वाढतेच आहे. आम्हाला अॅडव्हान्समध्ये अमुक एका बिझनेसची हमी मिळते, एअरलाईन्स-ट्रान्स्पोर्टर्स-हॉटेलियर्स ह्यांच्याशी नेगोसिएशन्स करण्यासाठी शक्ती येते. त्या आमच्या असोसिएट्सनाही तशीच खात्री मिळाल्यावर त्यांचीही पुढची कामं सोपी होतात. एकूणच जंबो डिस्काउंट हा ट्रिपल विन फॉर्म्युला ठरला तिघांसाठीही, पर्यटक - वीणा वर्ल्ड- असोसिएट्ससाठी, विन-विन-विन सिच्युएशन.
वीणा वर्ल्ड पाच वर्षांची झाल्यावर आम्ही जेव्हा मागे वळून पाह्यलं तेव्हा लक्षात आलं की कंपनी ब्रेक-इव्हनच्या जवळ लवकरच पोहोचेल, पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यात होतं की वीणा वर्ल्डला पर्यटकांनी आनंदाने स्विकारलं होतं. या ब्रॅन्डवर आपण विश्वास टाकू शकतो ही पत वीणा वर्ल्डने निर्माण केली होती पर्यटकांच्या मनात. हे सर्व व्हायला जी टीम लागते ती वीणा वर्ल्ड टीम आणि भारतात जगभरात जोडलं गेलेलं असोसिएट्सचं नेटवर्क वीणा वर्ल्डच्या मागे उभं राहिलं होतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे शून्य डेटाबेसवरून वीणा वर्ल्डकडे चार लाख पर्यटकांचा डेटाबेस तयार झाला होता. डेटा इज वेल्थ, डेटा इज पावरच्या या जमान्यात ह्या डेटाबेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक ट्रेंड्स ह्या डेटाच्या अॅनालिसिसमधून आम्हाला अभ्यासायला मिळाले. पर्यटक कधी बुकिंग करतात ह्या आमच्या मनातील ढोबळ कल्पनांना आता संख्याशास्त्राचा पाया मिळाला होता आणि गोष्टी अधिक स्पष्ट होत होत्या. त्याप्रमाणे आमच्या स्टॅ्रटेजिजमध्ये बदल होत होते. युरोप अमेरिकेचं बुकिंग पर्यटक नऊ-दहा महिने आधी करायला तयार असतात तर ऑस्ट्रेलिया जपान चायनासाठी हा कालावधी पाच-सहा महिने आधीचा असतो. साउथ ईस्ट एशिया आणि भारतासाठी हा कालावधी दोन ते तीन महिने आधीचा असतो. म्हणून तर जानेवारीतल्या समर ऑफरचा आमचा भर एशियातल्या - भारतातल्या सहलींवर जास्त असतो. आणखी एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे खूप आधी बुकिंग करणार्या पर्यटकांची संख्या तीस टक्के आहे, व्यवस्थित म्हणजे खूप आधीही नाही आणि उशिराही नाही अशा पर्यटकांची संख्या पन्नास टक्के आहे, एक दिड महिना आधी म्हणजे व्हिसा वैगेरे असेल तर धावपळ होते पण सहलीला जायला मिळतं असे सुट्ट्या मिळण्याची अडचण असणारे किंवा सुट्टीच उशिरा सँंक्शन होते असे पर्यटक पंधरा टक्के आहेत आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की गेल्या पाच वर्षात दरवर्षी अर्ध्या टक्क्याने वाढणारी एक नवीन पर्यटनप्रेमी पिढी तयार होताना दिसतेय ती आज-अभी-इसी वक्तवाली. आम्हाला आत्ताच जायचंय, कुठे नेताय बोला अशी. वीणा वर्ल्डची टॅगलाईन जगताहेत खर्या अर्थाने ती ही मंडळी, चलो, बॅग भरो, निकल पडो! जनरेशन आणि त्यांचं प्रमाण आहे पाच टक्के. इन्स्टंटवाली मनःस्थिती आणि नो लीव्हज वाली परिस्थिती ही चलो, बॅग भरो, निकल पडो! जनरेशन वाढवतेय.
आपला आवडता गुणी कलाकार जीतेंद्र जोशीने सांगितलेला किस्सा मला आठवला इथे, तो म्हणतो, मी कधीही ठरवून सहलीला निघत नाही. वेळ मिळाला की सरळ एअरपोर्टवर जातो, मिळेल ते विमान पकडतो, ते विमान जिथे घेऊन जाईल तिथे जातो आणि उतरल्यावर मिळेल त्या दिशेला, जसं हवं तसं मनसोक्त भटकतो. दम दम दमतो पण मनाने टोटली रीफ्रेश होतो आणि घरी परत येतो. वा! क्या बात है। असं भटकता आलं पाहिजे नाही आपल्या सर्वांनाच. जितू जोशीची भटकंती आणि ही चलो, बॅग भरो, निकल पडो! जनरेशन ह्यामध्ये मला साम्य दिसलं. दरवर्षी अर्ध्या टक्क्याने वाढणारी ही जनरेशन दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. आता पाच टक्के म्हणजे सद्यपरिस्थितीत आमचे वर्षाचे पाच हजार पर्यटक आहेत. ह्या लास्ट मिनिट जनरेशनसाठी आम्ही घेऊन आलोय, लास्ट मिनिट @ वीणा वर्ल्ड त्यांच्यासाठी विन-विन सिच्युएशन. वीणा वर्ल्डच्या सहली खूप आधी हाऊसफुल्ल होतात ही वस्तूस्थिती आहे आणि ते पर्यटकांचं प्रेम आहे. आत्ताही समरमधल्या युरोप अमेरिकेच्या शंभरहून अधिक सहली पूर्ण भरल्यात. पण आमच्याकडेही कधीतरी काही सहलींमध्ये थोड्या सीट्स रिकाम्या जातात. तिथे बंरच नुकसान होतं. ज्या सहलीत शक्य आहे तिथे अशा दोन ते चार सीट्स ह्या लास्ट मिनिटवाल्या आमच्या चलो, बॅग भरो, निकल पडो! पर्यटकांसाठी थोड्या सवलतीच्या दरात द्यायच्या असं आम्ही ठरवलंय. आमचं नुकसान टळेल आणि ज्या पर्यटकामुळे टळलं त्याला कमी किमतीत सहल मिळेल. विन-विन सिच्युएशन सतत निर्माण करीत राहणं हे आपलं काम. सो मंडळी, अशा जर काही सीट्स राहिल्या तर आम्ही त्या सहलीच्या एक आठवडा आधी पर्यटकांसाठी खुल्या करणार. आता बॅग भरूनच ठेवा. कुणी सांगावं कधीतरी तुमच्या मनातली एखादी सहल स्टील द डीलमध्ये तुम्हाला मिळूनही जाईल. त्यासाठी veenaworld.com वर मात्र तुम्ही चेक करीत राहिलं पाहिजे. हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.