‘आई मला वेळ नाहीये पण तू जा आणि धम्माल करून ये’, ‘बाबा तुम्ही बघताय नं व्हिसाचं काय चाललंय ते, आम्हाला सध्या भारतात येणं कठीण झालंय, तुम्ही आमची काळजी करू नका, आता आयुष्य एन्जॉय करा’,’आई बाबा तुमच्या अॅनिव्हर्सरीला नाही येता येणार, सुट्टी नाहीये’... घराघरात हे संवाद वाढायला लागलेत, दोष कुणाचाच नाहीये परिस्थितीच तशी आहे आणि एकमेकांना समजून घेणं हाच ह्यावर मार्ग. आम्ही पर्यटनातून ह्यावर तोडगा काढलाय तो सीनियर्स स्पेशल सहलींचा, आयुष्याच्या उत्तरार्धाचा आनंदी प्रारंभ करण्याचा...
वीणा वर्ल्ड सीनियर्स स्पेशल सहली ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ‘मस्ट’ अशी गोष्ट ठरलीय आजकाल. माझं या वर्षीच्या सीनियर्स स्पेशलच्या काही सहलींना देशविदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना भेटल्याचं टाईमटेबल पाहयलं तर तुम्हाला कल्पना येईल सीनियर्स किती मोठ्या संख्येने पर्यटन करतात त्याची. मंडळी ‘सीनियर्स आर नो मोअर सीनियर्स!’ आता ते सज्ज झालेयत जगपर्यटनासाठी, तरुणाईच्या उत्साहाने. पाठदुखी सांधेदुखीच्या कटकटी आत्ता कुठच्याकुठे पळायला लागल्यात, देशाटनाचा नवीन मकसद जो मिळालाय. सहलीवर ज्येष्ठ येऊन-येऊन सांगतात ‘अगं ह्या आठ-दहा दिवसांत जाणवलंपण नाही की आपली पाठ दुखत होती की पाय’ माझा हेतू हाच असतो. आपण वयानुरूप येणार्या छोट्या छोट्या शारीरिक कटकटींचा बाऊ करतो किंवा त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, आता हे होणारच असा स्विकार करतो नव्हे नांगी टाकतो. पण ज्यावेळी अशा सहलींना येतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे अजून तर ‘हम बहुत कुछ कर सकते हैं!’ प्रत्येक सहलीवर सर्वांना मी दोन उदाहरणं देते, पहिलं एक आपल्या माननीय पंतप्रधानांचं. पासष्ट वर्षाच्या व्यक्तीच्या हातात आपण आपला देश सुपूर्द केला तेव्हापासून आपण पाहतोय, तरुणालाही लाजवेल किंवा सीरियसली विचार करायला लावेल असं त्यांचं दिवसाचं आणि प्रवासाचं वेळापत्रक आहे. दुसरं उदाहरण माझ्या वडिलांचं, वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांनी अंटार्क्टिकाची सफर जोशात पार पाडली. त्यांना बोट लागली नाही की त्यांनी सकाळ संध्याकाळचं कोणतंही एक्सकर्शन चुकवलं. भले भले नांगी टाकतात अंटार्क्टिकाच्या ड्रेक पॅसेजला पार करताना. पण बाबा मात्र एकदम ठणठणीत. आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा.
मेडिसिन रीव्हॉल्युशनमुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढलीय. सेवानिवृत्तीचं वय मात्र तेवढंच ठेवलंय हे बरं आहे कारण नंतरच तर खरं आयुष्य लुटायचं असतं. त्यामुळे अठ्ठावन्न वा साठच्या व्यावसायिक निवृत्तीनंतर किमान पंधरा वर्ष, आयुष्यात जे काही करायला मिळालं नाही ते करण्यात आनंदात घालवायची. स्वत:साठी जगायचं, आपल्या सहचारी वा सहचार्यासोबत जगायचं, मित्र-मैत्रीणींसोबत जगायचं, जग बघायचं, जे अशक्य वाटतं तेच शक्य करायचं. डॉक्टर मंडळी हळूहळू औषधांच्या प्रीस्क्रिप्शनच्या जागी वीणा वर्ल्डची सीनियर्स स्पेशल टूर रेकमेंड करायला लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका बरं ! अहो एकतर ह्या सहलींमध्ये आपण आपल्याला टेस्ट करुन घेतो, एवढ्या गोष्टीत तुम्हाला बिझी ठेवतो की कंबर दुखतेय की पाठ दुखतेय हे त्या दहा पंधरा दिवसात आठवतच नाही, आणि उत्साह तर खंडीभर वाढतो. आणि एका सहलीवर जेव्हा दुसर्या सहलीचे वेध लागतात तेव्हा तर आयुष्याला आणखी वेगळा अर्थ मिळतो. माणसाच्या आयुष्यात समथिंग टू लूक फॉरवर्ड टू असतं नं तेव्हा जगण्याला आणखी उभारी येते आणि काही अल्पशा प्रमाणात का होईना हे काम आम्ही टूरिझमद्वारे करतोय. आता तुम्ही म्हणाल, वीणा लागली मार्केटिंग करायला. येस ऑफ कोर्स, मी बिझनेस वुमन आहे, त्यातही मार्केटिंग हा माझा विषय आहे पण ह्या सहलीवर एकदा येऊन तर बघा, ते सगळं मार्केटिंगच्या आणि व्यवसायाच्या पलिकडचं आहे. आमची संपूर्ण टीम ज्या तर्हेने बियाँड द कॉल ऑफ द ड्युटी काम करीत असते ते बघून कुणीही आश्चर्यात पडेल. आणि म्हणूनच तर पर्यटक जेव्हा खंडीभर उत्साह घेऊन परत येतात तेव्हा आम्ही आयुष्यभर पुरतील इतके आशीर्वाद घेऊन येत असतो आमच्या ज्येष्ठ पर्यटकांकडून.
आता सीनियर मंडळींनी ह्या सहलींवर येताना काय काय काळजी घ्यायला हवी ते बघूया. सर्वप्रथम महत्त्वाचं आहे सशक्त आनंदी मन. मला हे जमणारंच-झेपणारंच हा आत्मविश्वास बाणवणं खूप गरजेचं आहे. आणि ते जमतंही, आपणच मनातून घाबरत असतो. सो! तुम्ही असे आनंदी मनाने सहलीवर यायला तयार झालात की आम्ही आहोतच प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शनासाठी, मदतीला, संपूर्णपणे काळजी घ्यायला. दुसरी गोष्ट असते ती प्रकृतीच्या सतर्कतेची, ती उत्तम असली तरी प्रवासाची तयारी करण्याआधी एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि सहलीवर प्राथमिक औषधं सोबत ठेवणं फार महत्त्वाचं. जर आपण एखाद्या ऑपरेशनमधून गेला असाल किंवा आपल्याला कसली अॅलर्जी असेल किंवा आपल्या प्रकृतीसंबंधी काही खबरदारी असेल तर तसंही आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून ‘मेडिकल हिस्ट्री’ म्हणून लिहून घेऊन तो पेपर सोबत ठेवणं तसंच मोबाईलवर त्याचा फोटो सेव्ह करून ठेवणं व तो इथे भारतात असलेल्या आप्तांकडे ठेवणं गरजेचं आहे. ‘प्रीकॉशन इज बेटर दॅन क्युअर.’ त्यानंतर प्रत्येक पर्यटकाने, मग तो आठ वर्षाचा बालक असो वा ऐंशी वर्षांचे ज्येष्ठ, ट्रॅव्हल इन्शुरन्स करून सहलीला निघायचं. त्यासाठी आमच्या ऑफिसेसमधून आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन केले जाईल. ‘लेस लगेज मोअर कम्फर्ट’ ह्या उक्तीनुसार स्मार्ट पर्यटक बनूनच आपण प्रवासाला सुरुवात करायचीय. आपल्या बुकिंगनंतर त्या-त्या सहलीची, परदेश सहल असेल तर व्हिसासंबंधीची माहिती आणि मार्गदर्शन आपणास दिले जाईल. सो! मंडळी नॉट टू वरी ‘वीणा वर्ल्ड है ना!’
ज्येष्ठांसाठी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत, युरोपपासून न्यूझीलंडपर्यंत, राजस्थानपासून अंदमानपर्यंत सीनियर्स स्पेशल सहलींची मेजवानीच आम्ही वर्षभरात आणतो. गेल्या पाच वर्षात तर फक्त युरोपलाच ४०,०००हजारांपेक्षा जास्त पर्यटक वीणा वर्ल्डसोबत जाऊन आले, अगदी आनंदात आणि समाधानात. त्यामुळे निर्धास्तपणे ठरवा. पर्यटकांच्या मनातला, स्वप्नातला युरोप आम्ही अगदी त्यांना हवा तसा घेऊन आलो आहोत. कारण कोणतंही असो,प्रत्येक दर्दी पर्यटकाला युरोपची वारी करायची असतेच हे नक्की. शिवाय इतक्या देशांचे व्हिसा काढायचे म्हणजे दिव्य, तिकडचं हवामान आपल्याला सोसेल का? अशा एक ना अनेक शंका काढून आपणच युरोपचा रस्ता बंद करून टाकतो. आता तुम्ही म्हणाल युरोपला जायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? अजिबात नाही. पण म्हणून तर वीणा वर्ल्ड आहे, माझ्यासकट वीणा वर्ल्डचे सर्व डायरेक्टर्स आणि आमचे एक्सपर्ट टूर मॅनेजर्स युरोपमध्ये पूर्ण मुरलेले आहेत. युरोपमधील विविध देशांमधल्या टूरिझम बोर्डस्शी आमचे असलेले सलोख्याचे संबंध, कॉनस्युलेटच्या नियमांचं पूर्ण पालन,प्रॉपर डॉक्युमेंटेशन ह्यामुळे आम्ही व्हिसा प्रक्रिया अधिक सोप्पी केलीय. वीणा वर्ल्डबरोबर युरोप ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. आधी इटलीमधून सुरवात करा किंवा स्वित्झर्लंडमधून वा एकदम हटके म्हणून आधी नॉर्वेला भेट द्या किंवा नेदरलँडला जा, कुठूनही सुरुवात करा युरोपची जादू तुमच्यावर झाल्याशिवाय राहाणार नाही.
जगातल्या सात खंडांची आकारानुसार क्रमवारी केली तर युरोपचा नंबर सहावा म्हणजे शेवटून दुसरा येतो. अगदी वंशांपासून ते भाषेपर्यंत आणि संगितापासून ते खाद्यपदार्थापर्यंत प्रत्येक देश दुसर्यापेक्षा आपण कसे वेगळे किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यात फायदा होतो अर्थातच आपला म्हणजे पर्यटकांचा. जरा प्रवास केला की नवा देश सुरू. मग वेगळी भाषा, वेगळी माणसं, वेगळी संस्कृती आणि वेगळे खाद्यपदार्थ, अशा ठिकाणी आपल्यासारख्या पर्यटकांची अमळ चंगळच. उगाच का दरवर्षी सुमारे पंचेचाळीस कोटींपेक्षा जास्त पर्यटक युरोपला भेट देतात? कोणाला फ्रेंच रिव्हिएराच्या सागर किनार्यांची मजा लुटायची असते, तर कोणाला व्हेनिसच्या गंडोलाची रोमँटिक राईड करायची असते, कोणाला फिनलँडच्या सांताक्लॉज व्हिलेजमध्ये सांताला भेटायचं असतं तर कोणाला साल्झबर्गला मोझार्टच्या घरात त्याची सिंफनी ऐकायची असते. कोणाला नॉर्वेतला मध्यरात्रीचा सूर्य पाहायचा असतो तर कोणाला आल्प्सच्या बर्फात धम्माल करायची असते. अगणित अशा वरदहस्तांनी आणि माणसाच्या कर्तृत्व गाथेने नटलेला युरोप बघण्याचं प्रत्येक पर्यटकांचं नव्हे तर जगातल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं.
आता तरीही कुणाला वाटत असेल की मनातला युरोप वगैरे ठिक आहे, पण तो आमच्या खिशात बसतोय का? तर त्यासाठीच आहेत वीणा वर्ल्डचे वेगवेगळे डिस्काउंट्स. ह्या डिस्काउंट ऑफरमुळे तुम्ही हजारोंची बचत करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा हे सगळे डिस्काउंट मर्यादित जागांसाठी आणि मर्यादित कालावधींसाठी उपलब्ध आहेत. जसजशा सीट्स भरताहेत तशी डिस्काउंटची स्लॅब कमी होत चाललीय. त्यामुळे आता वेळ घालवू नका जास्तीत जास्त डिस्काउंट मिळविण्यासाठी लवकरात लवकर आपल्या सीट्स बूक करा आणि वाचलेल्या पैशांमध्ये स्वतःच्या शॉपिंगची सोय करा किंवा चक्क दुसरी सहल बूक करा. जोक अपार्ट, पण पैसे वाचविण्याबरोबरच लवकर बुकिंग केल्याचा आणखी फायदा म्हणजे व्हिसा प्रोसेसिंगला व्यवस्थित वेळ मिळतो. त्याचप्रमाणे जितक्या लवकर तुम्ही टूर बूक करता, तितकी बसमध्ये पुढची जागा मिळते.
वेगवेगळ्या वयोगटात एकदम लोकप्रिय असलेल्या युरोपच्या सहलींचे आमच्या ज्येष्ठांसाठीही भरपूर ऑप्शन्स आहेत. ज्येष्ठांच्या उत्तरायणाचा आनंदी प्रारंभ करणारी सीनियर्स स्पेशल युरोपची फुल फ्लेज तेरा दिवसांची वा नऊ दिवसांची वा सात दिवसांची किंवा पाच दिवसांची सहल आहे,फक्त स्वित्झर्लंडची देखील सहल आहे तर पंधरा दिवसांची स्कॅन्डिनेव्हिया रशियाची सहलही आहे.तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार आणि बजेटनुसार सहल निवडा आणि निघा पर्यटनाला. भेटूच एखाद्या सहलीवर !!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.